सोनाळा, बिबी येथे नवीन पोलीस स्टेशनला मंजुरी
By Admin | Updated: October 13, 2015 23:43 IST2015-10-13T23:43:55+5:302015-10-13T23:43:55+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील दोन प्रस्तावित पोलीस स्टेशनला शासनाची मंजुरी; पोलीस स्टेशनची संख्या पोहचली ३३ वर.
_ns.jpg)
सोनाळा, बिबी येथे नवीन पोलीस स्टेशनला मंजुरी
बुलडाणा: वाढत्या गुन्हेगारीच्या घटनेमुळे व कमी पोलीस संख्येमुळे पोलीस प्रशासनाला अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता, जिल्ह्यातील प्रस्तावित दोन नवीन पोलीस स्टेशनला राज्य शासनाने मंजुरी दिली असून, यात सोनाळा आणि बिबी येथील पोलीस स्टेशनचा समावेश आहे.
सध्या जिल्ह्यात ३१ पोलीस स्टेशन आहे. शिवाय दोन नवीन मंजूर झाल्यामुळे ही संख्या ३३ वर पोहचली. लोणार पोलीस स्टेशनचे विभाजन करून बिवी तसेच तामगाव स्टेशनचे विभाजन करून सोनाळा असे दोन पोलीस स्टेशन तयार करण्याचा प्रस्ताव बुलडाणा पोलीस प्रशासनाकडून राज्य शासनाच्या गृहविभागाकडे पाठविण्यात आला होता. संग्रामपूर येथील आदिवासीबहुल आणि अतिदुर्गम तालुक्यात तामगाव हे एकमात्र पोलीस स्टेशन होते. तसेच जगप्रसिद्ध खार्या पाण्याचे सरोवर असलेल्या लोणार पोलीस स्टेशनवरही पूर्ण तालुक्याची जबाबदारी होती. या दोन्ही पोलीस स्टेशनवरील वाढत्या लोकसंख्येचा भार लक्षात घेता, सोनाळा व बिबी अशा दोन पोलीस स्टेशनला मंजुरात देण्यात आली. सोनाळा पोलीस स्टेशन अंतर्गत २५ गावांचा समावेश करण्यात आला असून, सोनाळा, बावनबीर, लाडणापूर, वसाळी बु., अंबाबारवा, हडयामाल, चिंचारी, निमखेडी, चुनखेडी, गुमठी, शेंभा, साळवन, पिंप्री, पिंप्री बु., वानपुर, टुनकी बु., टुनकी खु., रोहन खिडकी, बोरखेड, बल्हाड, वानखेड, साईखेड, सगोळा, आलेवाडी, पलसोडा आणि संग्रामपूर उजाड येईल. बिबी पोलीस स्टेशन अंतर्गत २३ गावांचा समावेश करण्यात आला असून, बिबी, कोनाटी, खंडाळा, झोटिंगा, पिंप्री खंदारे, महारचिकना, सावरगाव वेली, खारखेड लाड, किनगाव जट्ट, खडेगाव, चोरपांग्रा, मांडवा, देऊलगाव कोल, ब्राह्मण चिकना, हिवरखेड, वसंतनगर, कुंबेफळ, खापरखेड घुले, चिखला काकड, गोवर्धन नगर, भुमराला, वर्दली खु. आणि देवा नगर समावेश आहे.
जागेसाठी शोध सुरू
राज्य शासनाद्वारा सोनाळा व बिबी येथे नवीन पोलीस स्टेशन मंजुरात मिळाल्यानंतर बुलडाणा पोलीस प्रशासनाकडून दोन स्टेशनसाठी अस्थाई स्वरूपात खासगी इमारतीच्या जागेसाठी शोध सुरू आहे. सोबतच या स्टेशनमध्ये किती अधिकारी व कर्मचार्यांची आवश्यता आहे, हे अजून निश्चित होणे बाकी आहे.