नवीन हरबरा येताच पडले भाव !

By Admin | Updated: March 20, 2017 02:01 IST2017-03-20T02:01:22+5:302017-03-20T02:01:22+5:30

शेतक-यांना आर्थिक फटका; तीन महिन्यात तीन हजाराने घसरले दर.

New Haribara fell in the morning! | नवीन हरबरा येताच पडले भाव !

नवीन हरबरा येताच पडले भाव !

बुलडाणा, दि. १९- बाजारात नवीन हरबरा येताच हरबर्‍याचे भाव कमी झाले आहेत. गत तीन महिन्यात तीन हजार रुपये प्रतिक्विंटलने हरबर्‍याचे दर घसरले असून, सध्या ४ हजार रुपयापर्यंतच हरबर्‍याला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसत आहे.
पावसाळा चांगला झाल्याने यावर्षीच्या रब्बी हंगामासाठी जमीनीत चांगला ओलावा होता. त्यामुळे यावर्षी हरबरा पीक चांगले आले. सध्या हरबरा काढणीचा हंगाम सुरू असून, शेतकर्‍यांना एकरी जवळपास ८ ते १0 क्विंटलपर्यंंत हरबरा उत्पादन होत आहे. तसेच मागील वर्षी हरभर्‍याला सरासरी १0 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव होता. त्यामुळे यावर्षी सहाजीकच हरभरा पिकाचे क्षेत्र वाढले. तसेच जमीनीतील ओलावा, गेल्यावर्षी हरबर्‍याला मिळालेले चांगले दर व सिंचनाची सुविधा असलेल्या बहुतांश शेतकर्‍यांनी यावर्षी हरबर्‍याचे उत्पादन घेतले. मात्र शेतकर्‍यांच्या घरात हरभर्‍याचे पीक येण्याअगोदर फेब्रुवारी महिन्यातच हरबर्‍याचे दर घसरले. आता नवीन हरबरा बाजारामध्ये येताच त्यात आणखी घसरण झाली आहे.
२0१६ मध्ये सुरूवातीला जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये हरभर्‍याला ९ हजार ५00 ते ११ हजार ६00 रुपये भाव होता. तर डिसेंबरमध्ये ६ ते ७ हजार रुपयांपर्यंत भाव होता; मात्र गेल्या तीन महिन्यात ३ हजार रुपयांने प्रतिक्विंटल हरबर्‍याचे भाव पडले आहेत. सध्या हरबर्‍याचे उत्पादन वाढले असल्याने केवळ ४ ते ४ हजार ५00 रुपयांपर्यंंत हरबर्‍याला प्रतिक्विंटल भाव मिळत आहेत. उत्पादन येताच हरबर्‍याचे भाव घसरल्याने हरबरा उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे.

तूरीपाठोपाठ हरबर्‍यालाही फटका!
काही दिवसांपासून जिल्ह्यात तूर खरेदीचा खेळखंडोबा सुरू आहे. नाफेडकडून शेतकर्‍यांच्या तूर खरेदीस टाळाटाळ सुरू असून, शासनाने दिलेल्या हमीभावात तूर विक्री करण्यासाठी शेतकर्‍यांची धडपडत सुरू आहे. तूरीपाठोपाठ आता हरबर्‍यालाही फटका बसत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत तूर व हरभर्‍याच्या भावात हजारो रुपयांपेक्षाही घसरण आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Web Title: New Haribara fell in the morning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.