मेहकर बसस्थानकाचे नवीन बांधकाम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:34 IST2021-04-08T04:34:49+5:302021-04-08T04:34:49+5:30
राज्य परिवहन महामंडळाला घराघरातून चांगले उत्पन्न मिळते. मेहकर आगारातून ग्रामीण भागासह विविध ठिकाणी गाड्या पाठविण्यात येतात. लोकसंख्येनुसार बसस्थानकाची जागा ...

मेहकर बसस्थानकाचे नवीन बांधकाम रखडले
राज्य परिवहन महामंडळाला घराघरातून चांगले उत्पन्न मिळते. मेहकर आगारातून ग्रामीण भागासह विविध ठिकाणी गाड्या पाठविण्यात येतात. लोकसंख्येनुसार बसस्थानकाची जागा अपुरी पडत असल्याने शासनाने या बसस्थानकाचे नवीन बांधकाम करावे. यासाठी नागरिकांनी वेळोवेळी शासनाकडे मागणी केली होती. शासनाने याची दखल घेऊन या नवीन बांधकामासाठी दोन वर्षापूर्वी तीन कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. बांधकामाचा कंत्राट देऊळगाव राजा येथील सृष्टी कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आले. मात्र संबंधित ठेकेदारांनी बसस्थानकाची इमारत पाडून सात ते आठ महिने उलटले. त्यानंतर तेथे केवळ खड्डे खोदून ठेवलेले असून, बांधकामाला अजून सुरुवात न केल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
चौकट...
पर्यायी बसस्थानकात घाणीचे साम्राज्य
बसस्थानकाची इमारत पाडल्यानंतर पर्यायी व्यवस्था म्हणून सोनाटी रस्त्यावर बस स्थानकाची व्यवस्था करण्यात आली. मात्र त्याठकाणी ही घाणीचे साम्राज्य असल्याने प्रवाशांना ही सेवा डोकेदुखी ठरत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक होताना दिसत आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला लाखो रुपयांचे उत्पन्नपासून वंचित राहण्याची वेळ येताना दिसत आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी आगारप्रमुखांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.
कॅप्शन-- बसस्थानकाच्या नवीन इमारतीसाठी खोदून ठेवलेले खड्डे.