मेहकर मतदारसंघात २९६ मतदान केंद्रांवर नव मतदार नोंदणी
By Admin | Updated: August 29, 2014 23:50 IST2014-08-29T23:40:29+5:302014-08-29T23:50:35+5:30
मेहकर मतदारसंघात २७४३९३ मतदार; मेहकर तालुक्यातील १६४ गावांचा समावेश.

मेहकर मतदारसंघात २९६ मतदान केंद्रांवर नव मतदार नोंदणी
मेहकर : विधानसभा निवडणूकीच्या हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीच्यावेळी मतदारांची नावे मतदार यादीत नसल्यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचीत रहावे लागते. त्यामुळे यावेळस मतदार संघातील २९६ मतदान केंद्रावर नविन मतदारांच्या नावाची नोंदणी करण्याची विशेष मोहिम केंद्रस्तरीय अधिकार्यांच्या उ पस्थितीत राबविण्यात येणार आहे.
बहुतांश मतदान केंद्रावर मतदार यादीत काही मतदारांचे नाव न आल्यामुळे त्यांना मतदानापासून वंचीत राहावे लागते. त्यामुळे निवडणूकीपूर्वी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करणे आवश्यक असते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अशा अडचणी निर्माण होऊ नये, म्हणुन मेहकर मतदार संघातील २९६ मतदान केंद्रांवर नविन मतदारांच्या नावाची नोंदणी करण्याची विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. म तदारांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी आचार संहिता लागु झाल्यानंतर आठवड्यातील पहिल्या रविवारी आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जन्म तारखेचा दाखला आणि रहिवासी प्रमाणपत्र जमा करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रभाकर बेंडे, मेहकर तहसिलदार निर्भय जैन, लोणार तहसिलदार मनीष गायकवाड यांनी केले आहे.
*मेहकर मतदार संघात २७४३९३ मतदार
मेहकर मतदार संघात २९६ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, २ लाख ७४ हजार ३९३ मतदार आहेत. त्यामध्ये पुरूष मतदार १ लाख ४४ हजार ३३६ आणि महिला मतदार १ लाख ३0 हजार ५७ आहेत. मेहकर मतदार संघात विधानसभा निवडणुकीमध्ये लोणार तालु क्यातील ५७ गांवांचा समावेश आहे; तर मेहकर तालु क्यातील १६४ गावांचा समावेश आहे.