बोरी येथे बेवारस अर्भक आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 17:38 IST2019-02-08T17:38:01+5:302019-02-08T17:38:22+5:30
मेहकर: तालुक्यातील बोरी येथे स्त्री जातीचे बेवारस अर्भक शुक्रवारी सकाळी आढळून आले.

बोरी येथे बेवारस अर्भक आढळले
मेहकर: तालुक्यातील बोरी येथे स्त्री जातीचे बेवारस अर्भक शुक्रवारी सकाळी आढळून आले. दरम्यान, या अर्भकास सध्या मेहकर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बोरी येथील झोपडपट्टी कॅनॉल जवळील उकिरड्यावर हे अर्भक आढळून आहे. शेख गफ्पार शेख अब्बास यांना सकाळी प्रथमत: हे अर्भक दृष्टीपथास पडले. त्याची माहिती त्यांनी पोलिस पाटील शिवाजी आंबादास बचाटे यांना दिली. प्रकरणी बचाटे यांनी मेहकर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल हरीदास चव्हाण हे करीत आहे. नवजात अर्भकावर सध्या मेहकर येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.(प्रतिनिधी)