जलयुक्त शिवारला प्राधान्य तर ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’कडे दुर्लक्ष
By Admin | Updated: June 12, 2017 13:31 IST2017-06-12T13:31:11+5:302017-06-12T13:31:11+5:30
ग्रामीण भागातजलसंवर्धनासाठी शासन कोट्यवधी रूपये खर्च करीत असून, रेन वॉटरहार्वेस्टींगकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे.

जलयुक्त शिवारला प्राधान्य तर ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’कडे दुर्लक्ष
बुलडाणा : एकीकडे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून ग्रामीण भागात
जलसंवर्धनासाठी शासन कोट्यवधी रूपये खर्च करीत असून, रेन वॉटर
हार्वेस्टींगकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे.
जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा बसतात. यावर्षी ८६
गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ ७१ विंधन विहिरी व २५ कूपनलिकांना
मंजुरात देण्यात आली होती. ती ३६ गावात ४४ टँकर सुरू करण्यात आले होते.
यासाठी ३६ लाख ९८ हजार रूपये खर्च करण्यात आले. आता पावसाळा सुरू झाला
असून काही गावात पाणीटंचाई जाणवत आहे. मागील पाच-सहा वर्षांपासून पाणी
वाचविण्यासाठी शासनाव्दारे विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या योजनामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग समावेश होता. जिल्ह्यात घर किंवा
इमारत बांधकाम करताना रेन वॉटर हार्वेस्टिंगची सोय असणे आवश्यक असल्याची
बांधकाम करणाऱ्यांना सक्ती करण्यात येत होती. मात्र प्रत्यक्ष बांधकाम
झाल्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंगची सोय न करणाऱ्या इमारतींना पालिका
प्रशासन किंवा नगर रचना विभगाने बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न देण्याचे
धोरण अवलंबिले होते काय? तसेच ज्यांनी हे धोरण अवलंंबिले नाही,
त्यांच्यावर कोणती कारवाई केली याबद्दल संबंधित विभागाकडे कोणतेच उत्तर
नाही. त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे बांधकाम करणारे दुर्लक्ष करताना
दिसून येत आहेत.
रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये पाण्याची मोठी बचत
बुलडाणा जिल्ह्यात दर उन्हाळ्यामध्ये मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे
लागत असून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी
लागत आहे़ हे सर्व पर्यावरण संवर्धन व रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या
दुर्लक्षाचे परिणाम आहेत़ जिल्ह्यात वाढत्या बांधकामामुळे पावसाचे पाणी
जमिनीत मुरत नसल्याने पाण्याची पातळी खालावत आहे़ प्रत्येक घर व
सोसायटीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यास मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत
होऊन टंचाईला आळा बसेल .