फुकटच्या नावाखाली नेटचे बॅलन्स गूल!

By Admin | Updated: April 7, 2015 01:55 IST2015-04-07T01:55:57+5:302015-04-07T01:55:57+5:30

व्हॉटस् अँप कॉलिंगचा बागुलबुवा; उत्साही नेटीझन्सला बसला फटका.

Net ball balance in the name of free! | फुकटच्या नावाखाली नेटचे बॅलन्स गूल!

फुकटच्या नावाखाली नेटचे बॅलन्स गूल!

बुलडाणा : व्हॉटस् अँप कॉलिंग सुरू झाले आणि अवघ्या नेटिझन्समध्ये या कॉलिंगची धूम सुरू झाली. गेल्या अनेक महिन्यांपासून व्हॉटस् अँप कॉलिंगची चर्चा सर्वत्रच सुरू होती. त्याची वाटही बघितली जात असतानाच या आठवड्यात ही सुविधा सुरू झाल्याने गेल्या तीन-चार दिवसांपासून व्हॉटस् अँप कॉलिंगचीच चर्चा दिसून येत असुन हे कॉलींग फुकट असल्याचेही अ पडेटस् व्हॉटस् अँपवर होते मात्र प्रत्यक्षात हे कॉलींग फुकट नसुन मोबाईल मधून नेटचा डाटा संपविणारे असल्याचे समोर आले आहे. उत्साहाचा भरात कॉलींग करणार्‍या अनेकांचे नेट बॅलन्स या कॉलींगमुळे गूल झाले. व्हॉटस् अँपवर फुकट फुकट म्हणून जोरदार प्रचार झालेला हा प्रकार खराच फुकट आहे का याची शहानिशा न करता त्याचा वापर करणार्‍या अनेकांचा डाटा लवकर संपल्याने नेटिझन्सच्या पदरी निराशाच पडली आहे. येथील मोबाईल रिचार्ज विक्रेते राजेंद्र वाघमारे यांनी सांगीतले की, गेल्या दोन तीन दिवसांपासुन असे व्हॉटस् अँप कॉलींग करणारे उत्साही युवक बॅलन्स कसे संपले हे जाणुन घेण्यासाठी येत आहेत.

Web Title: Net ball balance in the name of free!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.