बैलगाडीतून नवगत विद्यार्थ्यांची मिरवणूक

By Admin | Updated: June 28, 2016 01:32 IST2016-06-28T01:32:14+5:302016-06-28T01:32:14+5:30

गिरोली खुर्द येथे बैलगाडीतून प्रभातफेरी काढून विद्यार्थ्यांचे स्वागत.

Neighboring students' procession in the bullock cart | बैलगाडीतून नवगत विद्यार्थ्यांची मिरवणूक

बैलगाडीतून नवगत विद्यार्थ्यांची मिरवणूक

देऊळगावराजा (जि. बुलडाणा): तालुक्यातील गिरोली खुर्द येथे नवगत विद्यार्थ्यांना बैलगाडीतून प्रभातफेरी काढून स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी बैलगाडीचे सारथ्व करून विद्यार्थ्यांना शाळेत नेले. त्यामुळे गावात आगळा-वेगळा उत्साह दिसून आला.
नर्सरीपासून प्राथमिक, माध्यमिक ते कनिष्ठ महाविद्यालयीन शैक्षणिक वर्षाला सोमवारपासून प्रारंभ झाला. देऊळगाव राजा शहरासह तालुक्यातील सर्वच शाळांत शाळेच्या पहिल्याच दिवशी संस्थाचालकासह शिक्षक पालक व बाल गोपाळांपासून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. तालुक्यातील गिरोली खुर्द गावात शाळा प्रवेशाचा उत्सव सोहळा पार पडला. आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. गिरोली नगरीतून शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनीची प्रभातफेरी काढण्यात आली. आकर्षक सजवलेल्या बैलगाडीत शालेय गणवेश परिधान करून बसलेल्या विद्यार्थ्यां बैलगाडीचे सारथी आ.डॉ.खेडेकर बनले होते. शाळेच्या प्रवेशव्दारावर आ.डॉ.खेडेकर, बीडीओ अशोक सानप, बी.ओ.मुसदवाले, मुख्याध्यापक यांनी शालेय मुलांचे व पालकांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती गाठत असतांना चिकाटी, मेहनत ठेवण्याचे आवाहन केले. देऊळगावराजा हायस्कूलमध्ये विद्यार्थी व पालकांचे पुष्पगुच्छ देत प्राचार्य एम.आर.थोरवे यांनी स्वागत केले. सर्वांच्या उपस्थितीत समाजसुधारक शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. न.पा.च्या म्युनिसीपल, शिवाजी हायस्कूलमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी व पालक उत्साहाने हजर होते.

Web Title: Neighboring students' procession in the bullock cart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.