सकारात्मक कार्यासाठी युवकांना जोडण्याचे कार्य नेहरू युवा केंद्राने करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:40 IST2021-09-24T04:40:31+5:302021-09-24T04:40:31+5:30

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्र बुलडाणाच्या जिल्हा कार्यक्रम सल्लागार समितीची सभा २२ सप्टेंबर ...

The Nehru Youth Center should work to connect the youth for positive work | सकारात्मक कार्यासाठी युवकांना जोडण्याचे कार्य नेहरू युवा केंद्राने करावे

सकारात्मक कार्यासाठी युवकांना जोडण्याचे कार्य नेहरू युवा केंद्राने करावे

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्र बुलडाणाच्या जिल्हा कार्यक्रम सल्लागार समितीची सभा २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या सभेला जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सुनील पाटील, जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. ज्ञानोबा कांदे, भारत स्काउट जिल्हा संघटक सुभाष आठवले, प्रा. प्रभाकर वारे, जिल्हा अग्रणी बँकेचे विजय गवळी, जि. प. आरोग्य विभाग प्रतिनिधी जी. पी. देवकर, क्रीडा अधिकारी आर. आर. धारपवार, लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत, राष्ट्रीय सेवाकर्मी नितीन महाले, गणेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. आभार जिल्हा युवा अधिकारी डागर यांनी मानले.

कृती आराखड्यावर चर्चा

या सभेत वर्ष २०२१-२२ चा कार्यक्रम कृतिआराखडावर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र यांनी नेहरू युवा केंद्र संगठण नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कृती आराखडा तयार करण्यात आल्याचे सांगितले. त्यामध्ये ‘आजादी का अमृत महोत्सवा’निमित्त फीट इंडिया फ्रीडम रन २.०, महात्मा गांधी यांच्या १५० जयंती उत्सव स्वच्छता अभियान व श्रमदान कार्यक्रम, युवा संमेलन, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिवस व सप्ताह अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन कोविड-१९ च्या नियमांचे पालन करून करण्यात येणार आहे. सर्व कार्यक्रमांमध्ये जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, राष्ट्रीय सेवा योजना, जिल्हा उद्योग केंद्र अशा विविध विभागांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले.

Web Title: The Nehru Youth Center should work to connect the youth for positive work