शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नीरज चोप्रा कुटुंबीयांचे बुलडाणा जिल्ह्याशी श्रद्धेचे नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 11:42 IST

Neeraj Chopra : महाराष्ट्रातील नात्यागोत्यातील असलेल्या लोकांच्या भेटीची या परिवाराला नेहमीच ओढ राहिली आहे.

- मनोज पाटीललोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : महाराष्ट्राच्या मातीशी नाते असलेल्या पानिपतच्या रोड मराठा समाजातील नीरज चोप्रा या तरुणाने भालाफेकीत जगज्जेतेपद मिळवित देशाच्या सन्मानात भर घातली. या तरुणाच्या कुटुंबीयांचे जिजाऊ सृष्टी मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याशी श्रद्धेसह भावनिक नाते आहे. हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील खंडरा या गावचा मूळ रहिवासी असलेल्या नीरज चोप्रा यांचे काका भीम चोप्रा व ॲड. कर्मवीर चोप्रा व व क्षत्रिय मराठा महासभा कर्नालचे अध्यक्ष रामपाल मुळे हे दिल्लीतील एका मित्राच्या माध्यमातून सन २००९ मध्ये ते १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिंदखेड राजा येथे आले होते. दरम्यान, त्यांची राहण्याची व्यवस्था डॉ. गोपाल डिके यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्यानंतर जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त चोप्रा परिवार सिंदखेड राजा येथे आले. त्यावेळी डॉ. गोपाल डिके यांनी त्यांची चिखली अथवा बुलडाणा येथील विश्रामगृहावर राहण्याची व्यवस्था केली होती. त्यावेळी त्यांना जिल्ह्यातील लोणार येथील प्रसिद्ध सरोवर व शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरसुद्धा दाखविले. जुलै २०१५मध्ये खासदार प्रतापराव जाधवांसह महाराष्ट्रातील सहा शिवसेना खासदारांचे शिष्टमंडळ पानिपत शौर्य भूमी दर्शन व रोड मराठा समाजाच्या भेटीकरिता पानिपतला गेले होते. 

खंडरा येथे दाेन दिवस केला हाेता मुक्काम महाराष्ट्रातील नात्यागोत्यातील असलेल्या लोकांच्या भेटीची या परिवाराला नेहमीच ओढ राहिली आहे. येथील संपर्कातून या परिवाराने डॉ. गोपाल डिके यांना घरी येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले. त्यांच्या आग्रहास्तव सन २०१९मध्ये डॉ. डिके हे त्यांच्या खंडरा गावी गेले. त्यावेळी नीरज चोप्राच्या घरीच दोन दिवस मुक्कामी राहिले. दरम्यान या परिवाराने त्यांना पानिपत, कर्नाल, कुरुक्षेत्र दाखविले. 

नीरज चोप्रा यांच्या कुटुंबीयांसोबत दोन दिवस राहण्याचा अनुभव मी घेतला आहे. अत्यंत मनमिळावू कुटुंब असून, आजही चोप्रा परिवार माझ्या संपर्कात आहे. खंडरा येथे गेलो तेव्हा नीरज चोप्रा पटियाला येथे प्रशिक्षणासाठी गेले होते. हा उल्लेखही त्यावेळी या कुटुंबीयांनी माझ्याकडे करीत नीरज हा निश्चितच चोप्रा कुटुंबियांचे नाव मोठे करेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला होता. तो आज खरा ठरल्याचा मला आनंद आहे.             - डॉ. गोपाल डिके,‌‌ बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाMalkapurमलकापूरNeeraj Chopraनीरज चोप्रा