कडुनिंबाच्या महाकाय झाडाचे घेतात दर्शन!

By Admin | Updated: May 2, 2017 00:13 IST2017-05-02T00:13:23+5:302017-05-02T00:13:23+5:30

खामगाव : तालुक्यातील रोहणा येथील १०० वर्षांहून अधिक जुन्या कडुनिंबाच्या महाकाय झाडाला महत्त्व प्राप्त झालेले असून, नागरिक या झाडाचे भक्तिभावाने दर्शन घेताना दिसून येतात.

Neem tree takes nectar big tree! | कडुनिंबाच्या महाकाय झाडाचे घेतात दर्शन!

कडुनिंबाच्या महाकाय झाडाचे घेतात दर्शन!

खामगाव : तालुक्यातील रोहणा येथील १०० वर्षांहून अधिक जुन्या कडुनिंबाच्या महाकाय झाडाला महत्त्व प्राप्त झालेले असून, नागरिक या झाडाचे भक्तिभावाने दर्शन घेताना दिसून येतात.
रोहणा येथील रामदास गव्हाळे यांच्या शेतामध्ये सुमारे १०० वर्षांहून अधिक जुने कडुनिंबाचे विशाल झाड आहे. या झाडाच्या बुंध्याचा घेर एवढा मोठा आहे, की एकाचवेळी झाडाला आलिंगन द्यायचे असेल, तर किमान ५ माणसे लागतील. तसेच झाडाच्या फांद्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असून, त्यांची घनदाट व विशाल सावली पडत असते. याच झाडाखाली मरीमातेचे मंदिर आहे. त्यामुळे दर्शनासाठी भाविकभक्त येत असतात. ते मरीमातेसोबतच कडूनिंबाच्या झाडाचेही दर्शन घेतात.

वयाचा अंदाज काढणे कठीण
हे झाड किती वर्ष जुने आहे, यासंदर्भात रामदास गव्हाळे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले, की आजरोजी माझे वय ८० वर्ष असून, अगदी लहान असल्यापासून मी हे झाड पाहत आहे. माझे वडीलसुद्धा त्यांच्या लहानपणापासून हे झाड पाहत असल्याचे सांगत होते. त्यामुळे झाड १०० वर्षाहून अधिक जुने आहे. पण, त्याचे नेमके वय सांगणे अवघड आहे, असे गव्हाळे म्हणाले.

Web Title: Neem tree takes nectar big tree!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.