बुलडाणा जिल्ह्यातील ४८३ तलावावर नील क्रांती योजना
By Admin | Updated: March 21, 2017 01:43 IST2017-03-21T01:43:43+5:302017-03-21T01:43:43+5:30
मत्स्योत्पादनाला प्रोत्साहित करण्यासाठी उपाययोजना.

बुलडाणा जिल्ह्यातील ४८३ तलावावर नील क्रांती योजना
नीलेश शहाकार
बुलडाणा, दि. २0- जिल्ह्यामध्ये मोठे जलक्षेत्र मत्स्योत्पादनासाठी अनुकूल आहे. मत्स्योत्पादनाला प्रोत्साहित करण्यासाठी नील क्रांती योजना राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील ४८३ तलावांचा यात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे केंद्र शासनाकडून यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाकरिता जिल्हा योजनेंततर्गत निरनिराळे कार्यक्रम राबविले जातात. युवकांना प्रशिक्षण, खार्या व गोड पाण्यातील मत्स्य संवर्धन, मासेमारी साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना भाग भांडवल, मच्छीमारांना विमा उतरविण्यासाठी अनुदान इत्यादी योजनांचा यात सहभाग आहे. आता यात नील क्रांती योजनेचा समावेश झाला आहे.
जिल्ह्यात पैनगंगा, खडकपूर्णा, पूर्णा, नलगंगा, विश्वगंगा, मस, कोराडी या सात नद्या आहे. तर सिंचन विभाग, जिल्हा परिषद, ग्रा.पं., नगरपालिका यांच्या अधीन असलेले ४८३ तळे, सरोवर व जलाशये उपलब्ध आहे. ज्याची एकूण लांबी ४४0 कि.मी. एवढी आहे. याअंतर्गत मत्स्य व्यवसायासाठी १0 हजार ९२३.६ हेक्टर जलक्षेत्र आले आहे; मात्र बर्याच जलाशयाला कोरड पडल्याने मत्स्यव्यवसायाला धोका निर्माण होतो. यामुळे या नवीन योजनेतून मत्स्योत्पादन वाढीसाठी प्रयत्न होणार आहे.
बेरोजगारांना मिळणार रोजगार!
नील क्रांती योजनेत रोजगार निर्मितीच्या दृष्टीने बेरोजगारांसाठी ५0 टक्के अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे. यासाठी केंद्र शासनाकडून २९ कोटी ४१ लाख ८६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, राज्य शासनाला १४ कोटी ७0 लाख ९३ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
५५९ लाख मत्स्यबीजांची निर्मिती
मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी जवळ कोरडी पाटबंधारे प्रकल्पाखाली मत्स्यबीज निर्मित केंद्र उभारण्यात आले आहे. यात ५५९ लाख मत्स्यबीज निर्मिती करण्यात आली असून कटला, रोहू, मृगळ, साप्रनस, ग्रासकार्य, सिल्हरकार्य आदी जातीच्या मत्स्य बीजांचा समावेश आहे.
विभाग तलावाची संख्या
सिंचन विभाग-१0२
जिल्हा परिषद-३३१
ग्रामपंचायत- ४७
नगरपालिका- 0३
एकूण - ४८३
जिल्हा तलाव व नद्यांची संख्या जास्त असून मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून यात मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. त्यामुळे नील क्रांती योजनेतून बेरोजगारांच्या हाताला काम मिळले. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी शासनाच्या योजनेचा लाभ द्यावा.
- स. इ. नायकवाडी
सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय विभाग, बुलडाणा.