ठोस मदतीची गरज
By Admin | Updated: November 24, 2014 00:38 IST2014-11-24T00:38:23+5:302014-11-24T00:38:23+5:30
बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळाचे सावट, शेतकरी आर्थिक संकटात.

ठोस मदतीची गरज
बुलडाणा : यावर्षी अर्वषनामुळे खरीपाचा हंगाम शेतकर्यांच्या हा तून गेला. रब्बीच्या हंगामाची स्थिती तशीच आहे. यामुळे दुष्काळाचे संकट जिल्ह्यावर ओढावले आहे. महसुल विभागाने काढलेल्या ४२ पैसे आणेवारीमुळे जिल्ह्यातील दुष्काळावर शिक्कामोर्तब झाले आहे. या परिस्थितीची पाहणी करण्याकरीता महसूल मंत्री एकनाथ खडसे २४ नोव्हेंबर रोजी बुलडणा जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. त्यामुळे आर्थिक संकटात सा पडलेल्या जिल्ह्यातील शेतकर्यांना ठोस मदतीचे आश्वासन देवून दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यावर्षी अल्प पावसामुळे जिल्ह्यात खरीप हंगामात मूग, उडिदाचे पीक शेतकर्यांच्या हातून गेले. मोताळा तालुक्यासह काही भागात दुबार-तिबार पेरणी करूनही अनेक भागात सोयाबीनचे पीक उगवले नाही. उगवलेल्या सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही प्रचंड घट झाली. एकरी ५0 किलो ते एक क्विंटलपर्यंत सोयाबीनचे उत्पादन झाले. कपाशी पिकांच्या उत्पादनातही कमालीची घट झाली असून जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. त्यामुळे आ िर्थक संकटात सापडलेल्या दुष्काळग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. दरम्यान अमरावती विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, पालक सचिव आर.डी.शिंदे यांनीही जिल्ह्यातील विविध भागातील शेतामध्ये पाहणी करून पीक परिस्थीतीचा आढावा घेतला. अखेर महसूल विभागाने जिल्ह्याची ४२ पैस आणेवारी काढल्याने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात दुष्काळ असल्याचे समोर आले. त्यामुळे महसूल मंत्री खडसे यांनी जिल्ह्या तील दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी ठोस मदत जाहीर करून महसूल विभागाला निर्देश द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.