प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी मानसिकता बदलण्याची गरज

By Admin | Updated: October 17, 2014 23:48 IST2014-10-17T23:48:58+5:302014-10-17T23:48:58+5:30

‘लोकमत परिचर्चे’तील सूर : हरित सेना जनजागृती करणार.

The need to change the mindset for pollution free Diwali | प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी मानसिकता बदलण्याची गरज

प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी मानसिकता बदलण्याची गरज

बुलडाणा : दिवाळी म्हणजे नवीन कपड्यांची रेलचेल, सकाळ-संध्याकाळी नवे नवे गोड पदार्थ, रात्री लख्ख प्रकाशाची आरास व सोबत कानठळ्या बसणार्‍या फटक्यांचा आवाज, असे एकूण चित्र सर्वत्र दिसून येते. मात्र अशा प्रकाराचा आनंद घेताना तो क्षण अनेकांना दुख देवून जातो. अतितिव्रतेच्या आवाजाचे फटाके अनेकांना कायम स्वरूपी बहिरेपण देवून जातात. तर अनेक चिमुकल्यांना शारीरिक अपंगत्व देवून जातात. त्यामुळे दिवाळी ध्वनी प्रदुषण मुक्त होण्यासाठी सर्वसामान्यांची मानसिकता बदलण्याची गरज असत्याचा सूर लोकमतने आयोजित केलेल्या परिचर्चेतून निघाला. यावेळी हरीत सेनेने समाजात विविध माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला.
उत्सव कोणताही आला की चर्चा सुरू होते ती प्रदूषणाचीच. गणेशोत्सव आला, की नदीच्या प्रदूषणाची आणि दिवाळी आली की हवेच्या प्रदूषणाची. भारतीय संस्कृती निसर्गाच्या अधिकजवळ जाणारी संस्कृती आहे. भारतीय सण म्हणजे निसर्गाची पुजा, मात्न असे असताना अलिकडच्या काळात सणांनीही प्रदूषण वाढविण्यात मोठा हातभार लावला असल्याचे नाकारता येत नाही.
दिवाळी साजरी करताना सामाजिक जाणीवांचे भान आपण एक जबाबदार नागरिक म्हणून नेहमीच ठेवायला हवे. फटाक्यांची आतषबाजी करताना ध्वनीची तीव्रता किती प्रमाणात वाढते याचा कधी आपण विचारच करत नाही. ध्वनी व वायू प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा तोल बिघडतो व फार मोठया संकटास आपण आमंत्नण देतो. फटाके पेटवल्याने प्रदूषणातही भरच पडते. वायू प्रदुषणापेक्षा दिवाळीत ध्वनी प्रदूषण जास्त दिसतं. फटाके जाळल्यानंतर १२५ डेसिबल पेक्षाही मोठया प्रमाणात आवाज येणार्‍या फटाक्यांवर कायद्यानं बंदी घातली गेलीय. तरीही काही माणसं मोठया प्रमाणात ध्वनी प्रदूषण करणार्‍या फटाकांचा वापर टाळण्याचं नाव काही घेताना दिसत नाहीत. जास्त ध्वनी प्रदूषण झाल्याने कमी ऐकू येणं, उच्च रक्तदाब, हार्टअटॅक तसेच झोपे संबंधींच्या व्याधी सतावतात. अचानक वाढलेल्या ध्वनी प्रदुषणाच्या संपर्कात आल्याने तात्पुरता किंवा नेहमीसाठी बहिरेपणा होण्याची शक्यता असते. सर्व प्राणीमात्नांसाठी, व्यक्तींसाठी तसेच पर्यावरणासाठी येणारा दिवाळीचा सण सुरक्षित आणि अनुकून पध्दतीनं साजरा करण्याची प्रतिज्ञा आपण सर्वांनी केली पाहिजे. तसेच यंदा प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करून पुढच्या पिढीला चांगले पर्यावरण देण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असा सूर परिचर्चेत निघाला.

Web Title: The need to change the mindset for pollution free Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.