शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइनमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढतोय मान, पाठीचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 17:14 IST

Khamgaon News खामगाव शहरातील हाडांच्या तज्ज्ञ डाॅक्टरांकडे दैनंदिन येणाऱ्या रुग्णांपैकी १० टक्के विद्यार्थी आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना तासन्‌तास समोर बसून राहावे लागते. पाठदुखीचा त्रास वाढत आहे, तसेच हाडे ठिसूळ होऊ शकतात. मान झुकवल्याने मानेचाही त्रास वाढत आहे.

-  सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोना लाॅकडाऊन काळात शाळा बंद असल्याने ऑनलाइन वर्ग मोबाइलद्वारे सुरू झाले. त्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचे आता हाडांच्या डाॅक्टरकडे वाढलेल्या रुग्णसंख्येतून पुढे येत आहे. खामगाव शहरातील हाडांच्या तज्ज्ञ डाॅक्टरांकडे दैनंदिन येणाऱ्या रुग्णांपैकी १० टक्के विद्यार्थी आहेत. त्यांना मान व पाठदुखीचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत, असे शहरातील अस्थिरोग तज्ज्ञ डाॅ. भगतसिंग राजपूत यांनी सांगितले. लाॅकडाऊनच्या काळात शाळांचे वर्ग ऑनलाइन सुरू झाले. मोबाइलद्वारे वर्गात सहभागी होताना विद्यार्थ्यांना तासन्‌तास समोर बसून राहावे लागते. अनेक विद्यार्थ्यांकडे बसण्यासाठी पुरेसी किंवा आरामदायक बैठक व्यवस्था नाही, त्यामुळे अनेक विद्यार्थी मोबाइलसमोर पाठ वाकवून बसतात. त्याच अवस्थेत तासन्‌तास बसल्याने पाठदुखीचा त्रास वाढत आहे, तसेच हाडे ठिसूळ होऊ शकतात. तर मोबाइल स्टॅण्डवर न ठेवता कोणत्याही स्थितीत ठेवून त्यासमोर मान झुकवल्याने मानेचाही त्रास वाढत आहे. काही विद्यार्थी मांडी घालून बसतात. परिणामी, दोन्ही पायात मुंग्या येणे, नसा दबण्याची शक्यताही डाॅक्टरांनी व्यक्त केली आहे, तर हा प्रकार सतत सुरू राहिल्यास भविष्यात कुबडे निघण्याचा त्रासही होऊ शकतेा, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

प्रतिबंधासाठी उपाय

  •   मोबाइल स्टॅण्डवर ठेवा.
  •   मैदानात खेळणे, व्यायाम, प्राणायाम करावा.
  •  बसण्याची पद्धत सुधारावी.
  •  पाठ सरळ ठेवावी.
  •  भाज्या, फळांचा आहारात समावेश करा.
  •  

दैनंदिन तपासणीसाठी बाह्यरुग्ण विभागात १० टक्के विद्यार्थी येत आहेत. त्यांना प्रामुख्याने पाठ व मानदुखीचा त्रास आहे. त्यांच्यावर हाेणारे परिणाम पाहता पालकांनी ऑनलाइन मोबाइल वर्गाबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. - डाॅ. भगतसिंह राजपूतअस्थिरोग तज्ज्ञ, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावonlineऑनलाइनStudentविद्यार्थी