शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा - राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 17:46 IST2018-10-05T17:45:37+5:302018-10-05T17:46:27+5:30

खामगाव :  शहरातील मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोवस्त करण्यात यावा. मोकाट कुत्र्यांना पकडून नसबंदी  करण्यात यावी, यासह विविध मागण्यांच्या सोडवणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी मुख्याधिकाºयांना निवेदन देण्यात आले.

NCP's memorandum to municipal counsil officer | शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा - राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन

शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा - राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन

खामगाव :  शहरातील मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोवस्त करण्यात यावा. मोकाट कुत्र्यांना पकडून नसबंदी  करण्यात यावी, यासह विविध मागण्यांच्या सोडवणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी मुख्याधिकाºयांना निवेदन देण्यात आले.

शहरातील मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करून गावाबाहेर सोडण्याचा ठराव खामगाव पालिकेच्या २८ फेब्रुवारी २०१७ च्या सभेत घेण्यात आला होता. सद्यस्थितीत याकडे पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून, शहरात मोकाट जनावरांची संख्या वाढीस लागली आहे. आगामी काळात पालिकेने याबाबत तात्काळ उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर तालुकाध्यक्ष गणेश माने, शहर अध्यक्ष देवेंद्र देशमुख, धोंडीराम खंडारे, सोशल मिडीया तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, जगन्नाथ शेगोकार, आकाश गवळे, बंटी हट्टेल, रमाकांत गलांडे, अरूण गायगोळ आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Web Title: NCP's memorandum to municipal counsil officer