जिल्हा बँकेमुळेच राष्ट्रवादीचा पराभव
By Admin | Updated: November 19, 2014 01:03 IST2014-11-19T01:03:48+5:302014-11-19T01:03:48+5:30
पवारांची कबुली : अलीबागच्या शिबिरात बुलडाण्याचा उल्लेख.

जिल्हा बँकेमुळेच राष्ट्रवादीचा पराभव
बुलडाणा : अनियमितता व गैरप्रकारामुळे डबघाईस आलेल्या जिल्हा बँकांची स्थिती या बँकांमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वामुळेच झाल्याचा गैरप्रचार करण्यात आल्यामुळेच राष्ट्रवादीचा निवडणुकीत पराभव झाला. वर्धा व बुलडाणा येथे राष्ट्रवादीची स्थिती मजबूत असतानाही झालेला हा पराभव बँकेच्या स्थितीमुळे झाल्याची कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
अलीबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निवडणुकीनंतर सुरू असलेल्या ह्यवेध भविष्याचाह्ण या चिंतन शिबिरात ते बोलत होते. यावेळी विविध मतदारसंघातील परभवाचे विेषण करताना त्यांनी बुलडाण्याचा उल्लेख केला. नागपूर, वर्धा व बुलडाणा येथील जिल्हा सहकारी केंद्रीय बँका या राष्ट्रवादीच्या प्रभावात असून, या बँका अडचणीत आल्या आहेत. या बँकांना मदत करण्याची भूमिका काँग्रेस शासनाने घेतली नाही व बँका अडचणीत आल्या.
त्यामुळे निवडणुकीच्या कालावधीत त्याचा फटका राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसल्याचे ते म्हणाले. मत मागण्यासाठी या मतदारसंघात गेल्यावर मतदार जिल्हा बँकांचे पासबुक दाखवित होते. त्यामुळे येथील पराभव जिल्हा बँकेच्या स्थितीमुळेच असल्याचे त्यांनी अधोरेखीत केले. पवारांचे भाषण प्रसारमाध्यमांवर पाहिल्यानंतर जिल्हाभरात पुन्हा एकदा जिल्हा बँकेचा मुद्दा चर्चेत आला आहे.