राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’चे दिवस संपले
By Admin | Updated: October 20, 2014 00:07 IST2014-10-20T00:07:12+5:302014-10-20T00:07:12+5:30
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी संपुष्टात, शिवसेना उमेदवार शशिकांत खेडेकर विजयी.

राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’चे दिवस संपले
अशोक इंगळे / सिंदखेडराजा (बुलडाणा)
गत १५ वर्षांपासून सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीची सत्ता निर्विवाद हो ती. परंतु, भावनिक लाटेवर राष्ट्रवादीला छेद देत शिवसेनेने आपला शिवधनुष्य चालवत प्र थमच नेत्रदीपक विजय संपादन केला. डॉ. शशिकांत खेडेकर यांनी १८ हजार ८५४ मताधि क्य घेतल्याने मातृतीर्थ विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकला. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा पितृपक्ष होता. पितृपक्षात एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. शेवटच्या तीन दिवसांत अर्ज दाखल करण्यात आले. राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे मतदार पाहत होता. परंतु, डॉ. शिंगणे २७ सप्टेंबरची शेवटची तारीख संपेपर्यंंत मतदारसंघात फिरकलेच नाहीत. ह्यराहील तर याच मतदार संघातह्ण हा हट्ट कायम ठेवत आणि पक्षानेतृत्वावर दबाव टाकत राष्ट्रवादीची उमेदवारी रेखाताई खेडेकर यांनी मिळविली. डॉ. शिंगणे यांची भुमिका काय, हे कळण्याअगोदर मतदारांनी स्वत:ची भूमिका घेत २७ सप्टेंबरलाच शिवसेना उमेदवार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्याविषयी भावनिक लाट निर्माण केली. त्यातच जालना येथे एका हॉटेलात डॉ. शिंगणे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या बैठकीचाही फटका रेखा खेडेकर यांना बसला. या मतदारसंघात डॉ. शिंगणे म्हणजे राष्ट्रवादी हे समीकरण झाले आहे. त्या समीकरणाला छेद देण्याचे काम पक्षांतर्गत होऊन राष्ट्रवादीचा पराभव झाला, हे नाकारून चालणार नाही. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. तो कुणामुळे हिरावला गेला, याचे आत्मचिंतन स्वत: पक्षनेतृत्वाने करावे. मतदार हा कधीच लादलेला उमेदवार स्वीकारत नाही, तर आपला उमेदवार आणि नेता स्व त:च ठरवत असतो, हेच विधानसभा निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट केले आहे.