राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:37 IST2021-02-09T04:37:32+5:302021-02-09T04:37:32+5:30

या बैठकीला सर्व फ्रंटलचे व सेलचे जिल्हाध्यक्ष चिखली तालुका व शहर कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. काझी ...

NCP review meeting held | राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक संपन्न

या बैठकीला सर्व फ्रंटलचे व सेलचे जिल्हाध्यक्ष चिखली तालुका व शहर कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. काझी यांनी कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गृहमंत्री ना. अनिल देशमुख, ना. डॉ.राजेंद्र शिंगणे व आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांचा सन्मान करण्यात आला ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असून तीनही मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असल्यामुळे निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मान उंचावली असल्याचे स्पष्ट केल्यानंतर तालुका व शहर राष्ट्रवादीने अभिनंदनाचा ठराव पारीत केला. यावेळी बहुजन समाज पार्टीचे रघुवीर डोंगरदिवे, रितेश डोंगरदिवे व नाना डोंगरदिवे तसेच रासपचे गजानन मोळवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. बैठकीला जि.प.चे बांधकाम सभापती रियाज खान पठाण, समाज कल्याण सभापती पूनम राठोड, महिला जिल्हाध्यक्षा अनुजा सावळे, महिला प्रदेश सरचिटणीस आशा पवार, माजी जि.प.उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर, राजू भोंगळ, विनायकराव पडघान, नरेश शेळके, मनोज दांडगे, दिलीप झोटे, राजू खेडेकर, संजय गाडेकर, भगवानराव काळे, विजय अंभोरे, प्रताप पवार, शहराध्यक्ष रवींद्र तोडकर, दत्ता खरात, राजू उबाळे, राम खेडेकर, संदीप मेहेत्रे, शेखर बोंद्रे, प्रशांत डोंगरदिवे, शेख रफीक, सदानंद मोरगंजे, युसूफ शेख, रहीम पठाण, प्रमोद पाटील, प्रमोद चिंचोले, दिलीप महाजन, निंबाबापू देशमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: NCP review meeting held