शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वेस्टझोन राष्ट्रीय ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत नयन सरडेला सुवर्ण

By निलेश जोशी | Updated: September 10, 2022 19:20 IST

११० मीटर अडथळा शर्यतीत चमकदार कामगिरी: राजस्थान, गुजराथच्या ॲथलिट्सना टाकले मागे

बुलढाणा : छत्तीसगडमधील रायपूर येथे होत असलेल्या ३३ व्या वेस्ट झोन राष्ट्रीय ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत बुलढाण्याच्या नयन सरडेने ११० मीटर अडथळा शर्यतीत १४.४७ अशी वेळ नोंदवत सुवर्ण पदकावर ११ सप्टेंबर रोजी नाव कोरले. यापूर्वी मुंबईत १९ ते २१ ऑगस्ट दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत ११० मीटर अडथळा शर्यतीत त्याने रजत पदकाची कमाई केली होती.

ॲथेलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने ९ सप्टेंबर पासून ही स्पर्धा सुरू असून ११ सप्टेंबर रोजी या स्पर्धेचा समारोप होणारआहे. सोमवारी या स्पर्धेत ११० मीटर अडथळा शर्यतीच्या प्रकारात नयन प्रदीप सरडेने १४.४७ सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. दरम्यान राजस्थानच्या ॲथलिट्सने १५.३६ सेकंदाची वेळ घेत रजत तर गुजरातच्या ॲथलिट्सने १५.६९ सेकंद वेळ घेत कांस्यपदका कमाई केली. राजस्थान व गुजरातच्या या दोन्ही खेळाडूंचे अडथळा शर्यतीतील आव्हान मोडून काढत नयन सरडेने ही कामगरी करत बुलढाण्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे. आपल्या यशाचे श्रेय तो राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे, राज्य ॲथेलिटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष गोपालसिंग राजपूत, क्रीडा प्रशिक्षक गणेश जाधव, विजय वानखेडे , राजेश डिडोळकर, समाधान टेकाडे, दीपक जाधव व आईवडिलांना देतो.

नागपूर येथील समशेर खान यांच्या मार्गदर्शनात तो सराव करतो.  ऐशियन गेम्ससाठी पात्रता चाचणी देणार गेल्या महिन्यात मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय स्पर्देत ११० मीटर अडथळा शर्यतीत नयनने रजत पदक पटकावत रायपूर येथील स्पर्धेसोबतच गोवाहाटी येथील राष्ट्रीय स्पर्धा आणि भोपाळ येथे १५ सप्टेंबर नंतर होणाऱ्या ऐशियन गेम्ससाठीच्या निवड चाचणीसाठी पात्र ठरला होता. आता रायपूर येथील स्पर्धेत सुवर्ण पदक त्याने पटकावल्याने त्याचा आत्मविश्वास वाढल्याने भोपाळ येथील निवड चाचणी व गोवाहाटी येथे होणाऱ्या स्पर्धेतील त्याच्या कामगिरीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून रहाले आहे. नयन सरडे हा सध्या नागपूर येथील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सराव करत असून बुलढाणा जिल्ह्याचे तो नेतृत्व करतो. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा