शेंदला उपकेंद्रांतर्गत ‘नवे पर्व नवी दिशा’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:47 IST2017-07-31T00:47:48+5:302017-07-31T00:47:52+5:30

'Nave parva navi disha' campaign at Shendra sub center | शेंदला उपकेंद्रांतर्गत ‘नवे पर्व नवी दिशा’ अभियान

शेंदला उपकेंद्रांतर्गत ‘नवे पर्व नवी दिशा’ अभियान

ठळक मुद्देकीर्तनातून दिला ‘बेटी बचाओ’चा संदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : ‘नवे पर्व, नवी दिशा, नवे संकल्प’, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हे अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद बुलडाणातर्फे ११ ते २६ जुलैदरम्यान राबविण्यात आले. त्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीणकुमार निकस यांच्या नेतृत्वामध्ये तालुक्यातील शेंदला उपकेंद्रांतर्गत हे अभियान पार पडले.
या अभियानामध्ये ग्राम पातळीवर ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’साठी जनजागृती करण्यात आली. गावोगावी अनेकांच्या घरावर आरोग्य कर्मचारी, अंगणवाडीसेविका, आशा स्वयंसेविका यांनी स्टिकर्स लावले. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चे फलक लावण्यात आले. तसेच उपकेंद्रांतर्गत असलेल्या शाळेमधून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण निकस यांनी जनजागृती होण्यासाठी कीर्तनाचा कार्यक्रम, तसेच निबंध स्पर्धासुद्धा आयोजित केली होती. या अभियानासाठी आरोग्य कर्मचारी, उपकेंद्रांतर्गत गावामधील सरपंच, ग्रा.पं. सदस्य, अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविका, सर्व मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, कर्मचारी व नागरिकांचे सहकार्य लाभले.

Web Title: 'Nave parva navi disha' campaign at Shendra sub center