शेतक-यांसाठी राष्ट्रवादी रस्त्यावर

By Admin | Updated: December 9, 2014 00:01 IST2014-12-09T00:01:29+5:302014-12-09T00:01:29+5:30

बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांंचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.

Nationalist street for farmers | शेतक-यांसाठी राष्ट्रवादी रस्त्यावर

शेतक-यांसाठी राष्ट्रवादी रस्त्यावर

बुलडाणा : जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करून शेतकर्‍यांचे वीज बिल माफ करावे, यांसह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रथमच रस्त्यावर उतरली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी आयोजित सभेत शेतकर्‍यांचा अवमान करणार्‍या सरकारच्या मंत्र्यांवर टीका करून विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली.
नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा सुरू झालेल्या या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे व जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी यांनी केले होते. मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांंनी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, शेतकरी आत्महत्या थांबवा, अशा घोषणा देऊन शहर दणाणून सोडले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर येताच मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर करण्यात आले. यावेळी डॉ. राजेंद्र शिंगणे, अँड. नाझेर काझी, माजी आमदार धृपदराव सावळे, माजी आमदार रेखाताई खेडेकर आदींनी मोर्चेकर्‍यांना संबोधित केले. त्यानंतर मोर्चाच्या शिष्टमंडळाने बुलडाणा जिल्हाधिकारी चिंतामणी जोशी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून सोयाबीनला पाच हजार, तर कापसाला प्रतिक्विंटल सात हजार रुपये हमी भाव देऊन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी करण्यात आली.

Web Title: Nationalist street for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.