राष्ट्रीय कबड्डी खेळाडू प्राजक्ता देशमुखचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:52 IST2017-09-09T00:51:47+5:302017-09-09T00:52:09+5:30
बुलडाणा: येथील चैतन्यवाडी परिसरातील रहिवासी तथा इंदुमती मेमोरियल फिजिकल कॉलेजच्या उपप्राचार्य प्राजक्ता देशमुख यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

राष्ट्रीय कबड्डी खेळाडू प्राजक्ता देशमुखचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: येथील चैतन्यवाडी परिसरातील रहिवासी तथा इंदुमती मेमोरियल फिजिकल कॉलेजच्या उपप्राचार्य प्राजक्ता देशमुख यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
खामगावजवळील कोलारी फाट्याजवळ ३१ ऑगस्ट रोजी दुचाकीवरून जात असताना देशमुख यांच्या गाडीला ट्रकने धक्का दिल्याने अपघात झाला होता. या अपघातामध्ये त्यांच्या समवेत असलेल्या प्राचार्य राऊत यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्राजक्ता देशमुख ह्या अपघातात गंभीररीत्या जखमी झाल्या असल्याने त्यांच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत होते; मात्र गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. प्राजक्ता देशमुख कबड्डीच्या राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू होत्या. महाविद्यालयात असतानाही त्यांनी कबड्डीच्या अनेक स्पर्धा जिंकत कलर कोट मिळविला होता. सोबतच इंदुमती मेमोरियल फिजिकल कॉलेजमध्ये उपप्राचार्य पदावर त्या कार्यरत होत्या.