राष्ट्रीय ग्रंथ सप्ताहनिमित्त कार्यशाळा
By Admin | Updated: November 22, 2014 23:49 IST2014-11-22T23:49:23+5:302014-11-22T23:49:23+5:30
माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात क्रमिक व संदर्भ ग्रंथाचे महत्त्व अबाधित.

राष्ट्रीय ग्रंथ सप्ताहनिमित्त कार्यशाळा
बुलडाणा : येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात राष्ट्रीय ग्रंथ स प्ताहाचे निमित्त साधून राष्ट्रीय पुस्तक संस्था, नवी दिल्ली व इन्टेग्रिटी ह्युमन डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ प्रदर्शन व कार्यशाळा पार पडली.
ग्रंथ प्रदर्शन व कार्यशाळेचे उद्घाटन सहाय्यक ग्रंथालय संचालक राठोड यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रं थालय संघाचे अध्यक्ष रमेश जनबंधू, प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे सचिव राम देशपांडे, अमरावती विभाग अध्यक्ष शामराव वाहुरवाघ, साहित्यिक नरेंद्र लांजेवार, सामाजिक कार्यकर्ती अरुणाताई कुल्ली, संस्था संचालिका संगीता पवार, जनसंपर्क अधिकारी सुनीता निकम उपस्थित होते. यावेळी रमेश जनबंधू यांनी माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात क्रमिक व संदर्भ ग्रंथाचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. वाचनाला ग्रंथाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन केले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी करून साहित्य क्षेत्रामध्ये तसेच इतर सामाजिक क्षेत्रामध्ये संस् था करीत असलेल्या कार्याचा त्यांनी उलगडा केला.