नारायण राणेंचे बेताल नव्हे तर माजलेले वक्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:39 IST2021-08-25T04:39:28+5:302021-08-25T04:39:28+5:30
बुलडाणा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य बेताल नसून माजलेले असल्याची टीका बुलडाणा ...

नारायण राणेंचे बेताल नव्हे तर माजलेले वक्तव्य
बुलडाणा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य बेताल नसून माजलेले असल्याची टीका बुलडाणा विधान सभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केली़ तसेच पाेलिसांनी कारवाई न केल्यास आमच्या पद्धतीने उत्तर देऊ असा इशाराही गायकवाड यांनी दिला़
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केले आहे़ या वक्तव्याच्या निषेध करीत आमदार संजय गायकवाड यांनी एक महिन्यापूर्वी केंद्रीय मंत्रीपद मिळाल्याने नारायण राणे यांना सत्तेचा माज चढला आहे़ विराेधी पक्षाने त्याला केवळ भुंकण्यासाठी साेडले असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले़ तसेच यापुढे असे वागाल तर घरात शिरून मारण्याचा इशाराही आमदार संजय गायकवाड यांनी दिला़ पाेलिसांनी जर कारवाई नाही केली तर जे बाेललाे ते करून दाखवू, असेही गायकवाड यांनी सांगितले़