नांदुरा पालिकेचे ११ नगरसेवक सहलीवर
By Admin | Updated: July 10, 2014 23:17 IST2014-07-10T23:17:14+5:302014-07-10T23:17:14+5:30
येथील ११ नगरसेवक सहलीवर निघून गेल्याची माहिती आहे.

नांदुरा पालिकेचे ११ नगरसेवक सहलीवर
नांदुरा : नांदुरा नगर परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक येत्या १७ जुलै रोजी दुपारी २ वाजता नगर परिषदेच्या सभागृहात होणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले असून आपल्याच गटाचा नगराध्यक्ष व उपाध्यक्ष व्हावा, यासाठी येथील ११ नगरसेवक सहलीवर निघून गेल्याची माहिती आहे. नांदुरा नगर पालिकेत २१ सदस्य असून नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गाच्या महिलाकरीता आरक्षीत आहे. नगराध्यक्ष पदाकरीता भाजपाच्या सौ.सविता राजेश एकडे व भाजपाच्या सौ.पुष्पा लक्ष्मण झांबरे यांच्यात जोरदार स्पर्धा रंगली असून झांबरे यांच्या गटाचे ११ नगरसेवक सहलीवर गेलेले आहेत. एकडे गटाचे काही नगरसेवक सुध्दा सहलीला गेलेले असल्याचे सांगण्यात येत आहे. नांदुरा नगर पालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकणार असला तरी नगराध्यक्ष पदाची माळ सौ.एकडे यांच्या गळ्यात पडणार की झांबरे यांची वर्णी लागणार याकडे शहर वासियांचे लक्ष लागले आहे. मात्र १७ जुलै रोजी निवडणुकीनंतरच येथील चित्र स्पष्ट होणार आहे.