नांदुरा-खामगाव मार्ग झाला वेदनादायी !
By Admin | Updated: February 23, 2015 00:21 IST2015-02-23T00:21:00+5:302015-02-23T00:21:00+5:30
व्यथा चालकांच्या; वसंतराव भोजने करणार आंदोलन.

नांदुरा-खामगाव मार्ग झाला वेदनादायी !
नांदुरा (जि. बुलडाणा) : मार्ग मग तो आयुष्याचा असो की वाहनांचा, चांगला मार्ग असला तरच प्रवास चांगला होतो. नांदुरा-खामगाव हायवेवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्डय़ांमुळे वाहनांचे नुकसान तर होतेच, शिवाय अपघात तसेच पाठीच्या आजारामुळे चालकांच्या जीवनावरही वाईट परिणाम होतात. म्हणूनच खड्डे बुजविले नाही तर आंदोलन करू, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य वसंतराव भोजने यांनी शनिवारी दिला.
राष्ट्रीय महामार्गातील नांदुरा-खामगाव टप्प्यात नागपूरहून मुंबईकडे जाणार्या जड वाहनांची मोठी वर्दळ असते, तर नांदुरा-खामगाव प्रवासी वाहने आणि खाजगी वाहनांचीसुद्धा या रस्त्यावर दिवस-रात्र वर्दळ सुरू राहते. गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे चालकांकडून अपघात होतो. अशा घटनांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे.