नांदुरा येथे कोट्यवधी रुपयांचा तूर खरेदी घोटाळा!
By Admin | Updated: May 7, 2017 02:21 IST2017-05-07T02:21:01+5:302017-05-07T02:21:01+5:30
कृउबास संचालकांची तक्रार;संचालक आणि व्यापा-यांचे धाबे दणाणले

नांदुरा येथे कोट्यवधी रुपयांचा तूर खरेदी घोटाळा!
नांदुरा (जि. बुलडाणा) : तूर खरेदीच्या टोकन व विक्री रजिष्टरमध्ये घोळ करुन संचालक व व्यापारी यांनी संगमताने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असल्याची तक्रार खरेदी विक्री संघ व कृउबासचे संचालक मनोहर देशमुख(रा.सोनज) यांनी ५ मे रोजी जिल्हाउपनिबंधक यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीतून केली आहे. यामुळे संचालक आणि व्यापार्यांचे धाबे दणाणले आहे.
नांदुरा येथील कृउबासच्या बाजार खरेदी विक्री व बाजार समिती संचालक मनोहर देशमुख यांनी टोकन व विक्री रजिष्टरमध्ये शेतकर्यांच्या नावासमोर त्यांच्या क्षेत्रफळाच्या जागेत क्षेत्रफळ न लिहता ह्यएम.टी.एमह्ण अशी नोंद असून अनेकांच्या नावासमोर रिकाम्या जागा सोडल्या आहेत. त्याच बरोबर यादीतील काही शेतकर्यांच्या नावावरील क्षेत्रफळाच्या नोंदी तक्रारकर्त्यांंनी तपासल्या असता धक्कादायक प्रकार समोर आला. (प्रतिनिधी)
मोठय़ा प्रमाणात अफरातफर!
फक्त बारा गुंठेएवढय़ा क्षेत्रफळाची नोंद असलेल्या शेतकर्यांच्या नावावर तब्बल नव्वद क्विंटल तुरीची विक्री झाले आहे. या यादीत शंभरपेक्षा जास्त शेतकर्यांच्या नावावर शेकडो क्विंटल तुरीची विक्री दाखविली असून, अत्यल्प क्षेत्रफळात एवढी तूर त्यांनी कशी पिकवली हा प्रश्न शेष आहे. बहुतांश शेतकर्यांची तूर आज रोजी घरात पडून असताना संचालक व व्यापारी यांनी शेतकर्यांची हजारो क्विंटल तुरीची विक्री एफएसआयला करुन कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
रजिष्टर मधल्या नोंदीत गौंडबंगाल
खरेदी विक्री संघाने जे रजिष्टर नोंदीसाठी केले आहे. त्यामध्ये काही नावांसमारे एमटीएम अशी नोंद आहे. हा ह्यकोड वर्डह्ण कोणाचा आहे? तसेच पाच ते सात शेतकर्यांच्या नावासमोर एकसारख्या एकाच व्यक्तीच्या स्वाक्षर्या आहेत. तर काही नावे जिल्हा बाहेरीरची असून काहींच्या नावावर काही गुंठे क्षेत्रफळ असताना त्यांच्या नावावर साठ ते नव्वद क्विंटल तुरीची विक्री दाखवली आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे.