नांदु-यात पावणेतीन लाखांची घरफोडी
By Admin | Updated: March 5, 2016 02:31 IST2016-03-05T02:31:09+5:302016-03-05T02:31:09+5:30
६८ हजार सोन्या-चांदीचे मूर्ती व दागिने घर फोडून लंपास.

नांदु-यात पावणेतीन लाखांची घरफोडी
नांदुरा (जि. बुलडाणा): स्थानिक नागलकर प्लॉटमध्ये अज्ञात चोरट्यांनी १ लाख ९७ हजार रुपये नगदी तसेच ६८ हजार सोन्या-चांदीच्या मूर्ती व दागिने घर फोडून लंपास केल्याची घटना ३ मार्च रोजी उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ऋषिकेश सोळंके रा.सोनज यांचे नागलकर लेआउटमध्ये घर असून, ते २८ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान बाहेरगावी गेलेले होते. गॅलरीकडील बंद दरवाजा व खिडकी कशाच्या तरी सहाय्याने उघडून घरात प्रवेश केला.
अज्ञात चोरट्यांनी घरातील १ लाख ९७ हजार रुपये नगदी तसेच सोने-चांदीचे लक्ष्मीपूजनाचे शिक्के व दागिने ६८ हजार रुपयांचे, असा २ लाख ६५ हजारांचा ऐवज लंपास केला.
याबाबत ऋषिकेश शरदराव सोळंके रा.सोनज यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अप.क्र.७८/१६ कलम ४५४, ४५७, ३८0 भादंवि गुन्हा दाखल करून पुढील तपास एपीआय पाबळे करीत आहेत.