शेतक-यांसाठी नांदु-यात धरणे आंदोलन
By Admin | Updated: June 9, 2015 02:44 IST2015-06-09T00:23:11+5:302015-06-09T02:44:10+5:30
आम आदमी पार्टीचे तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे.

शेतक-यांसाठी नांदु-यात धरणे आंदोलन
नांदुरा (जि. बुलडाणा): शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी नांदुरा तालुका आम आदमी पार्टीने ८ जून रोजी तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.
हमीभावाच्या आधारावर स्थिर बाजारभाव शेतकर्यांना मिळावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी सरसकट लागू कराव्यात, कर्जमाफी द्यावी, पीकविम्याची व्याप्ती वाढवावी, जमीन अधिग्रहण अध्यादेश सरकारने मागे घ्यावा, नुकसान भरपाईत वाढ करावी, अशा सुमारे एकवीस मागण्यांसाठी आम आदमी पार्टी तालुका नांदुरा यांनी तहसील कार्यालयासमोर ८ जून रोजी धरणे आंदोलन केले. यामध्ये आम आदमी पार्टीचे अनिल जवरे, डॉ. नितीन नांदुरकर, डॉ. पाटील, प्रशांत वाकोडे, डी. पाटील, म. अंजुम, भाऊराव मुर्हे आदी सहभागी झाले होते.