बुलडाण्यात करबुडव्यांची नावे झळकली चौका चौकात
By Admin | Updated: March 20, 2017 13:26 IST2017-03-20T13:26:41+5:302017-03-20T13:26:41+5:30
वारंवार मागणी करूनही कर न भरणाºया नागरिकांची नावे चौका चौकात झळकविण्यात आली आहे.

बुलडाण्यात करबुडव्यांची नावे झळकली चौका चौकात
बुलडाणा : नगर पालिकेचे कर बुडविणाऱ्या व वारंवार मागणी करूनही कर न
भरणाऱ्या नागरिकांची नावे चौका चौकात झळकविण्यात आली आहे.
कर भरण्याचे आवाहन नागरिकांच्यावतीने करण्यात आले होते. मात्र नगर
पालिकेच्या आवाहनाला करबुडव्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नगर
पालिकेच्यावतीने कर बुडविणाऱ्यांची यादी चौकात झळकविणार असल्याचे आवाहनही
करण्यात आले होते. मात्र. त्यानंतरही न जुमानणाऱ्या नागरिकांची नावे अखेर
चौकात फलकावर झळकविण्यात आली. शहरातील जयस्तंभ चौक, संगम चौक,
जिल्हाधिकारी चौक, कारंजा चौक, तहसिल चौक, चिंचोले चौकात करबुडव्यांच्या
नावांचे फलक झळकविण्यात आले. शहरातील थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी कर
धारकांनी आपल्याकडे असलेल्या थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचा भरणा
सत्वर नगर परिषदेकडे करावा, अन्यथा थकीत कर धारकांचे नळ कनेक्शन खंडीत
करणे, मालमत्ता जप्तीची कार्यवाही करणे, मालमत्ता हर्रास करणे इत्यादी
अप्रीय कार्यवाही करण्यात येईल, असे नगर परिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार
चव्हाण यांनी कळविले आहे