नवी मुंबई विमानतळास वसंतराव नाईकांचे नाव द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:37 IST2021-08-26T04:37:09+5:302021-08-26T04:37:09+5:30
बुलडाणा : नवी मुंबई विमानतळास हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट राज्याचे साडेअकरा वर्ष मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात ...

नवी मुंबई विमानतळास वसंतराव नाईकांचे नाव द्या
बुलडाणा : नवी मुंबई विमानतळास हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट राज्याचे साडेअकरा वर्ष मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गाेरसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे़ गाेरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण व प्रदेशध्यक्ष नामदेव पवार यांच्या उपस्थितीत २४ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केले आहे की, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक यांनी त्यांच्या कारकिर्दीत अत्यंत कठोर निर्णय घेऊन नवी मुंबई हे शहर वसविले आहे. शहरामध्ये औद्योगिक विकास झपाट्याने व्हावा म्हणून औद्योगिक विकास महामंडळाला भरघोस निधी देऊन विकास कामाला गती देण्यात आली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून भविष्यात हे शहर देशाचे केंद्रबिंदू होणार या दृष्टीने मुंबईचा कायापालट करण्याचे काम त्यांनी केले, त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला वसंतरावजी नाईक यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे़ मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे़
यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. विजय राठोड, प्रा.अरविंद चव्हाण, सुभाष आडे, अनिल पवार, ईश्वर चव्हाण, राजू राठोड, डिगांबर चव्हाण, दिनकर पवार, तेजराव जाधव, प्रेमकुमार राठोड, संतोष जाधव, गजानन चव्हाण, पंडित जाधव, रामकृष्ण राठोडे, बळीराम राठोड, गजानन राठोड, सागर चव्हाण, सचिन चव्हाण, पवन जाधव, प्रकाश राठोड, संदीप चव्हाण, महेश राठोड, गोकुळ नाईक, संतोष आडे, फुलसिंग नायक यांच्यासह असंख्य गोरसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.