अंतिम फेरीत नागपूरचा दबदबा
By Admin | Updated: October 12, 2014 23:15 IST2014-10-12T23:14:08+5:302014-10-12T23:15:15+5:30
अकोला येथे सीबीएसई क्लस्टर-९ टेबल टेनिस स्पर्धेचा समारोप.

अंतिम फेरीत नागपूरचा दबदबा
अकोला : येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सीबीएसई क्लस्टर-९ टेबल टेनिस स्पर्धेत रविवारी शेवटच्या दिवशी झालेल्या अंतिम फेरीत नागपूरच्या खेळाडूंनी दबदबा निर्माण केला. १४ वर्ष व १६ वर्ष वयोगटातील मुलींच्या स्पर्धेचे विजेतेपद नागपूर येथील खेळाडूंनी प्राप्त केले. वैयक्तिक खेळाडूंचा पुरस्कारदेखील नागपूरच्या खेळाडूंनी मिळविला.
१४ वर्ष वयोगटातील मुलींच्या स्पर्धेचे विजेतेपद नागपूरच्या मॉर्डन स्कूलने पटकाविले. उपविजेतेपद कोल्हापूरच्या छत्रपती शाहू विद्यालयाने तर तृतीय पुरस्कार नारायणा विद्यालयम नागपूरला मिळाला. १४ वर्ष वयोगटातील मुलांच्या संघाचे विजेतेपद जिंदाल विद्या मंदिर वाशिंद, ठाणे या संघाने मिळविले. उपविजेतेपद भवन्स विद्यामंदिर नागपूर यांनी तर तृतीय पुरस्कार कोल्हापूर पब्लिक स्कूलने प्राप्त केला.
१६ वर्ष वयोगटातील मुलींच्या स्पर्धेचे विजेतेपद सेंट्रल पॉईंट स्कूल नागपूरने प्राप्त केले. उपविजेतेपद भवन्स विद्या मंदिर नागपूरने तर तृतीय पुरस्कार अंबुजा विद्या निकेतन चंद्रपूरने पटकाविला. १६ वर्ष वयोगटातील मुलांच्या स्पर्धेचे विजेतेपद इंदिरा नॅशनल स्कूल पुणेने पटकाविला. उपविजेतेपद नवरचना स्कूल वडोदरा तर तृतीय पुरस्कार भवन्स विद्या मंदिर नागपूर यांनी प्राप्त केला.
१९ वर्ष वयोगटातील मुलींच्या स्पर्धेत दिल्ली पब्लिक स्कूल सुरतने विजेतेपद पटकाविले. उपविजेतेपद देव पब्लिक स्कूल एैरोली नवी मुंबई तर तृतीय पुरस्कार भवन्स विद्या मंदिर नागपूर यांनी मिळविला. १९ वर्ष वयोगटातील मुलांच्या स्पर्धेत जिंदाल विद्या मंदिर वाशिंद, ठाणे यांनी विजेतेपद मिळविले. उपविजेतेपद भवन्स विद्या मंदिर नागपूर यांनी तर तृतीय पुरस्कार दिल्ली पब्लिक स्कूल सुरत यांनी मिळविला.
१४ वर्ष वयोगटात मुलींच्या एकल स्पर्धेत कादंबरी भांडारकर या नागपूर येथील मॉर्डन स्कूलच्या विद्यार्थिनीने विजेतेपद प्राप्त केले. उपविजेतेपद सुरत येथील दिल्ली पब्लिक स्कूलच्या जान्हवी भुपतानी हिने तर तृतीय पुरस्कार नाशिकच्या सिम्बॉयसिस स्कूलच्या साक्षी अफजलपूरकर हिने मिळविला. याच वयोगटात मुलांच्या एकल स्पर्धेत ठाणे-वाशिंद येथील जिंदाल विद्या मंदिरच्या जितेंद्र यादवने विजेतेपद, कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या वेदांत कुळकर्णी याने उपविजेतेपद तर भवन्स विद्या मंदिर नागपूरच्या साकेत गांधी याने तृतीय पुरस्कार मिळविला.
१६ वर्ष वयोगटात मुलींच्या एकल स्पर्धेत नागपूरच्या सेंटर पॉईंट स्कूलच्या रिक्वक्षा वली विजेती ठरली. उपविजेतेपद भवन्स विद्यामंदिर नागपूरच्या आरू वैष्णव हिने, तर तृतीय पुरस्कार दिल्ली पब्लिक स्कूल सुरतच्या संजना चोकसी हिने मिळविले. याच गटातील मुलांच्या एकल स्पर्धेत इंदिरा नॅशनल स्कूल पुणेच्या रोशन खिनवासरा याने विजेतेपद, तर कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या कौशिक जोशी याने उपविजेतेपद पटकविले. तृतीय पुरस्कार नाशिकच्या सिम्बॉयसिस स्कूलच्या श्रीहर कानिकर याला मिळाला.
१९ वर्ष वयोगटात मुलांच्या एकल स्पर्धेत सुरतच्या दिल्ली पब्लिक स्कूलच्या भाऊमिल रासकापूरवाला याने विजेतेपद, तर १६ वर्ष वयोगटात मुलींच्या एकल स्पर्धेत नागपूरच्या सेंटर पॉईंट स्कूलच्या रिक्वक्षा वली विजेती ठरली. उपविजेतेपद भवन्स विद्यामंदिर नागपूरच्या विलोक टावरी याने प्राप्त केले. तृतीय पुरस्कार जिंदाल विद्या मंदिर वाशिंद ठाणेच्या कान्हू जेना याने मिळविला.