नाफेडच्या केंद्रावर युकाँची तोडफोड!
By Admin | Updated: May 7, 2017 02:26 IST2017-05-07T02:26:09+5:302017-05-07T02:26:09+5:30
चिखली तालुका युवक काँग्रेसने शेतकरी संस्थेच्या कार्यालयाला कुलूप ठोकून रोष व्यक्त केला.

नाफेडच्या केंद्रावर युकाँची तोडफोड!
चिखली : नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावरील अवैध खरेदी थांबवावी, यासाठी चिखली तालुका युवक काँग्रेसने येथील केंद्रावर तोडफोड केली. शेतकरी संस्थेच्या कार्यालयाला कुलूप ठोकून रोष व्यक्त केला.
नाफेडच्या तूर खरेदीतील गोंधळ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दोन महिन्यांपासून मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहल्या जात असतानाच येथील खरेदी केंद्रावर विनाटोकन तूर मोजमाप सुरू असल्याची तक्रार युवक काँग्रेसच्या पदाधिकार्यांकडे शेतकर्यांनी केली, असता टीएमसी यार्डावर पदाधिकार्यांना शेतकी संस्थेच्या कर्मचार्यांनी विनाटोकन तूर खरेदी केल्याप्रकरणी तोडफोड करून आपला रोष व्यक्त केला. बाजार समितीच्या कर्मचार्यांनी सत्य परिस्थिती सांगितली असता, टोकन वाटपाची यादी पाहून, त्या प्रमाणे मोजमाप करण्यात यावे, अशी आग्रही मागणी केली. कार्यकर्त्यांंनी शेतकरी संस्थेत कोणीही कर्मचारी वा पदाधिकारी हजर नसल्याने, कार्यालयाला कुलूप ठोकले. कुंपणच शेत खात असेल तर न्याय तरी कोणाला मागायचा, संस्था चालकाच्याच तुरीची बिना टोकन मोजणी सुरू असल्याचा आरोप यावेळी युकॉ पदाधिकार्यांनी केला. या आंदोलनात तालुकाध्यक्ष रमेश सुरडकर, शहराध्यक्ष पवन गवारे, पिंटू गायकवाड, भास्कर काकडे, लिंबाजी सवडे, किशोर साळवे, संजय गिरी, पुरुषोत्तम शेळके, ज्ञानेश्वर सोळंकी, राजू सावंत, अरविंद झाल्टे, शिवाजी झाल्टे, रामेश्वर परिहार, राम डुकरे, बाळू साळोख आदींसह कार्यकर्ते सहभागी होते.