शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

निसर्गासोबत जगण्यासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 11:05 IST

My Earth या अभियानांतर्गंत पंचतत्त्वाशी संबंधित घटकांवर काम केले जाईल.

ठळक मुद्देप्रदुषण रोखण्यासह निसर्ग संवर्धनाचे उपक्रमराबवलेल्या विविध उपक्रमांचे मूल्यमापन केले जाणार आहे.

खामगाव : जैवविविधतेचे अस्तित्व टिकवून ठेवणे, पर्यावरण, वातावरणातील बदलांनुसार घडणाºया घटनांचे परिणाम सहन करण्याची सवय निर्माण व्हावी, यासाठी शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबण्याचा मार्ग ‘माझी वसुंधरा’ अभियानातून ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेल्या नागरिकांना सांगितला जाणार आहे. त्यासाठी २ आॅक्टोबर ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत.या अभियानांतर्गंत पंचतत्त्वाशी संबंधित घटकांवर काम केले जाईल. त्यामध्ये पृथ्वी घटकासाठी वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी, जमिनीचे धुपीकरण थांबवणे, या मुद्द्याशी संबंधित कामे केली जातील. तर वायूतत्त्वासाठी प्रदुषण कमी करणे, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, जल तत्त्वाशी संबंधित कामांमध्ये नदी संवर्धन, सागरी जैवविविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच सागरी किनाºयांची स्वच्छता करणे, अग्नी तत्त्वानुसार उर्जेचा परिणामकारक वापर करणे, उर्जा बचत, अपव्यय टाळणे, अपारंपरिक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतील. आकाश तत्त्वातील स्थळ व प्रकाशाने मानवी स्वभावात होणाºया बदलांसाठी जनजागृती करणे, यावर भर दिला जाईल.

- ६६७ संस्थामध्ये अभियानमाझी वसुंधरा अभियान राज्यातील ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबवले जाणार आहे. त्यामध्ये अमृत योजनेत असलेल्या २७ महापालिका व १६ अ वर्ग नगर परिषदा, नगर परिषद-२२६, नगर पंचायती-१२६ व ग्रामपंचायती-२७२ (१० हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या) आहेत. त्यापैकी रायगड, रत्नागिरी, गोंदिया जिल्ह्यांमध्ये १० हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असल्याची अट शिथिल करण्यात आली आहे.

- कामांचे होणार मूल्यमापनअभियानाच्या कार्यकाळात राबवलेल्या विविध उपक्रमांचे मूल्यमापन केले जाणार आहे. त्यामध्ये प्रत्येक घटकासाठी गुण ठरले आहेत.  मूल्यांकनामध्ये प्रत्येक संस्था संवर्गातील तीन संस्थांना ५ जून रोजी बक्षिस वितरण केले जाणार आहे. तसेच राज्यस्तरावरही निवड केली जाईल. 

 

टॅग्स :khamgaonखामगावenvironmentपर्यावरण