शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कापूस वेचण्यास गेलेल्या महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:53 IST

जळगाव जामोद: आपल्या स्वत:च्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या  महिलेचा अज्ञात आरोपीने खून करून पुरावा मिटविण्यासाठी एका  कोरड्या विहिरीत प्रेत टाकून त्यावर पालापाचोळा व माती लोटून पुरावा  नष्ट करण्याचा प्रयत्न गुरुवारी सायंकाळी तालुक्यातील आसलगाव  शिवारात घडून आला.

ठळक मुद्देविहिरीत प्रेत टाकलेआरोपीचा शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद: आपल्या स्वत:च्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या  महिलेचा अज्ञात आरोपीने खून करून पुरावा मिटविण्यासाठी एका  कोरड्या विहिरीत प्रेत टाकून त्यावर पालापाचोळा व माती लोटून पुरावा  नष्ट करण्याचा प्रयत्न गुरुवारी सायंकाळी तालुक्यातील आसलगाव  शिवारात घडून आला. याप्रकरणी जळगाव पोलिसांनी भादंविच्या कलम  ३0२, २0१ अन्वये गुन्हा नोंदविला असून, पोलीस पथक आरोपीचा शोध  घेत आहे.हरिभाऊ पंढरी इंगळे (वय ४६) आसलगाव यांनी दिलेल्या तक्रारीत असे  म्हटले आहे की, त्यांची पत्नी सुनीता (वय ३७) ही गावाला लागून  असलेल्या स्वत:च्या शेतात कापूस वेचण्याकरिता गेली असता सायंकाळी  ती शेतात नव्हती. कापसाचे गाठोडे व चपला शेताता होत्या. आजूबाजूच्या  शेतात शोध घेतला; परंतु सुनीता दिसून न आल्याने जळगाव पोलिसात  तक्रार दाखल केली. पोलिसांसमवेत तपास केला असता काही अंतरावर  असलेल्या एका कोरड्या विहिरीत सुनीताचे प्रेत दिसून आले. या प्रेतावर  पालापाचोळा व माती झाकलेली होती. सुनीताच्या शरीरावर जखमा होत्या. यावरून आधी अज्ञात आरोपीने खून करून नंतर हे प्रेत विहिरीत टाकले  असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणी वृत्त लिहीपर्यंत  कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. या प्रकरणाचा तपास पोलीस  निरीक्षक प्रदीप साळुंके यांचे मार्गदर्शनाला सहायक पोलीस निरीक्षक  मानसिंग चव्हाण हे करीत आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाDeathमृत्यू