लैंगिक अत्याचार करून दिव्यांग महिलेची हत्या; शेजारीच निघाला आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 17:40 IST2019-12-07T17:37:48+5:302019-12-07T17:40:42+5:30
खेर्डा येथील दिव्यांग महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना सात डिसेंबर रोजी उघडकीस आली.

लैंगिक अत्याचार करून दिव्यांग महिलेची हत्या; शेजारीच निघाला आरोपी
जळगाव जामोद: बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात येत असलेल्या खेर्डा येथील दिव्यांग महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना सात डिसेंबर रोजी उघडकीस आली. दरम्यान ठसे तज्ज्ञ, डॉग स्कॉड आणि फॉरेन्सीक नमुने घेणाºया पथकाने घटनास्थळी हजेरील लावत अनुषंगीक नमुने घेतले असून श्वानाने थेट आरोपीच्या घर गाठल्याने अत्याचार करणाºयास दुपारी दोन वाजताच अटक करण्यात आली आहे. रितेश गजानन देशमुख असे आरोपीचे नाव असून मृत महिलेच्या घराजवळच तो राहत होता. या कृत्याबाबत आरोपीने त्याच्या पत्नीजवळच लैंगिक अत्याचार व खून केल्याची कबुली दिली असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. अद्याप मृत महिलेच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला नसला तरी सकृत दर्शनी लैंगिक अत्याचार करून दिव्यांग महिलेची हत्या झाल्याच्या बाबीस त्यांनी पुष्टी दिली आहे.