किरकोळ वादातून रोहीणखेड येथे एकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:35 IST2021-02-05T08:35:04+5:302021-02-05T08:35:04+5:30
या घटनेत रोहीणखेड येथील शेख कदीर शेख रज्जाब (वय ६५) या व्यक्तिचा मृत्यू झाला. मृतक व्यक्ती उधारीच्या तीनशे ...

किरकोळ वादातून रोहीणखेड येथे एकाचा खून
या घटनेत रोहीणखेड येथील शेख कदीर शेख रज्जाब (वय ६५) या व्यक्तिचा मृत्यू झाला. मृतक व्यक्ती उधारीच्या तीनशे रुपयांच्या कारणावरून पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देण्यास जाणार असल्याची माहिती आरोपींना मिळाली. त्यामुळे त्यांनी लाकडी काठीने मारहाण करून त्यास जखमी केले असता त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रोहीणखेड येथे २६ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी मृत व्यक्तिचा मुलगा शेख साबीर शेख कदीर यांनी धामणगाव बढे पोलीस स्थानकात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी शेख फारुख शेख मुसा, शेख शाहरुख शेख फारुख, शेख जियॉ शेख फारुख व शेख रियाज शेख फारुख (सर्व राहणार रोहीणखेड) यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य पाहता उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक बरकते यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत ममताबादे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष गंद्रे करीत आहेत. पोलिसांनी या प्रकरणातील चारही आरोपींना अटक केली आहे.