१0 जणांवर खुनाचा गुन्हा

By Admin | Updated: June 16, 2014 22:48 IST2014-06-16T22:31:23+5:302014-06-16T22:48:22+5:30

लग्नसमारंभात झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झला होता. या प्रकरणातील १0 आरोपिंविरुद्ध साखरखेर्डा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Murder of 10 people | १0 जणांवर खुनाचा गुन्हा

१0 जणांवर खुनाचा गुन्हा

साखरखेर्डा : पेनटाकळी येथे एका लग्नसमारंभात झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झला होता. या प्रकरणातील १0 आरोपिंविरुद्ध साखरखेर्डा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पेनटाकळी येथे २७ एप्रिल रोजी लग्न सोहळा होता. या लग्न सोहळ्यात भावकीतच वाद झाल्याने प्रकरण हाणामारीवर पोहचले. सुमित शंकर शेजोळ यास दिनकर दौलत वानखेडे यांचेसह तिघांनी मारहाण केली. त्यांच्या तावडीतून सुटून सुमित हा मामा सुभाष वानखेडे यांच्याकडे गेला. त्या ठिकाणी दीपक, दिनकर वानखेडे, रमेश किसन वानखेडे, संदीप वामन वानखेडे, संजय संतोष वानखेडे, प्रकाश संतोष वानखेडे, निर्मला वामन वानखेडे, रत्नमाला रमेश वानखेडे यांनी पुन्हा समाजमंदीराजवळ सुमितला मारहाण केली. या दहाही आरोपितांनी सुभाषला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. डॉक्टरांनी त्याला बुलडाणा हलविण्याचा सल्ला दिला. परंतू, पेनटाकळी पर्यंत येत असतांना सुभाष वानखेडेचा मृत्यू झाला. या मृत्यूच्या घटणेने मुलगी आणि पत्नी बेशुद्ध पडले. या प्रकरणी रत्नमाला वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तब्बल ५0 दिवसानंतर आरोपी विरुध्द गुन्हे दाखल केले.

Web Title: Murder of 10 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.