शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हयातील पालिका कर्मचारी एक जानेवारीपासून संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 14:19 IST

नगर पालीका व नगर परिषद कर्मचारी, अधिकारी संघटनेने संपाचा निर्णय घेतला असून १ जानेवारी पासून बेमुदत संपाला प्रारंभ होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : पालिका कर्मचाºयांच्या विविध मागण्यांकरिता वारंवार संप व आंदोलने करूनही राज्य शासनस्तरावरून पालिका कर्मचाºयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. परिणामी, नगर पालीका व नगर परिषद कर्मचारी, अधिकारी संघटनेने संपाचा निर्णय घेतला असून १ जानेवारी पासून बेमुदत संपाला प्रारंभ होणार आहे. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा जिल्हयातील ११ नगरपालिका व २ नगरपंचायतीमधील सर्व संवर्ग कर्मचारी सहभागी होणार आहे. मोताळा, संग्रामपुर या दोन ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा देण्यात आला. ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत  असलेल्या कर्मचाºयांना नगर पंचायतमध्ये समाविष्ट करून घेणे व न.प. कर्मचाºयांचा दर्जा देणे आवश्यक असताना आजपर्यंत कृती करण्यात आली नाही . ती कृती तातडीने व्हावी. न.प.कर्मचाºयांच्या प्रलंबीत मागण्या  पुर्ण कराव्या, १ जाने. २०१६ पासुन विनाअट सातवा वेतन आयोग लागु करावा , रोजंदारी कर्मचारी कायम करणे, २४ वर्ष कालबद्ध पदोन्नतीची थकबाकी दयावी. कर्मचाºयांचे प्रश्न निकाली काढावे अशा विविध २० मागण्यांकरिता संघटनेअंतर्गत सर्वप्रथम निवेदन देण्यात आली होती, त्या निवेदनामधून १, जानेवारी २०१९ पासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा निर्णय घोषीत करण्यात आला होता. त्यावर राज्य शासनाने कोणतीच दखल घेतली नाही.१० डिसेंबर १८ रोजी मुंबई येथे नगर विकास राज्य मंत्री मा.रणजित पाटील यांच्यासोबत संघटनेची बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही व ठोस निर्णय न झाल्यामुळे न.प. कर्मचारी संघटना आपल्या निर्णयावर ठाम राहिली आहे .     (प्रतिनिधी)

 पालिकेच्या अत्यावश्यक सेवा होणार प्रभावित!यामध्ये न.पच्या पाणीपुरवठा, स्वच्छता, अग्निशमन आदी विभागाचे कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याने न.प.अंतर्गत पुरविल्या जाणाºया सर्व सेवा प्रभावीत होणार असल्याचे व न.प.कर्मचान्याच्या प्रलंबीत असलेल्या मागण्या निकाली निघेपर्यत या संपातून आम्ही माघार घेणार नसल्याचे नगर परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनंत निळे, व महाराष्ट्र राज्य न.प.कर्मचारी संघटनेचे कार्यकारी सदस्य  मोहन अहिर यांनी नमूद केले.  सोबतच नागरिकांना होणाºयाअसुविधेबद्दल त्यांनी निवेदनातून क्षमा देखील मागीतली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावEmployeeकर्मचारीStrikeसंप