बाजार समितीमध्ये मूग खरेदीचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 23:50 IST2017-08-17T23:50:08+5:302017-08-17T23:50:33+5:30
मेहकर : मेहकर कृउबासमध्ये १६ ऑगस्ट रोजी नवीन मूग खरेदीचा शुभारंभ सभापती माधवराव जाधव, उपसभापती बबनराव तुपे यांच्या हस्ते करण्यात आला.

बाजार समितीमध्ये मूग खरेदीचा शुभारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : मेहकर कृउबासमध्ये १६ ऑगस्ट रोजी नवीन मूग खरेदीचा शुभारंभ सभापती माधवराव जाधव, उपसभापती बबनराव तुपे यांच्या हस्ते करण्यात आला.
महारचिकना येथील शिवाजी घुगे व कोनाटी येथील कैलास वायाळ यांनी प्रत्येकी १0 पोते मूग विक्रीस आणले होते. त्या मुगाला पाच हजार एक रुपये भाव देण्यात आला. यावेळी सभापती माधवराव जाधव, उपसभापती बबनराव तुपे यांच्या हस्ते शेतकर्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अडते तेजराव म्हस्के, सोपानराव गारोळे, संचालक दत्ता शेळके, गजानन भोकरे, संजय सवडतकर, राजू चव्हाण, नारायण काबरा, सुरेश काळे, सचिव श्री.भि. बंगाळे, सहसचिव वि.ना. देशमुख, स.रा. बार्डेकर, प्र.ना. देशमुख, अ.य. माजरे, रा.म. चौधरी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.