परराज्यातील ५४६ जणांना स्वगृही पाठविण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 17:16 IST2020-05-02T17:16:12+5:302020-05-02T17:16:22+5:30
५४६ मजुर, नागरिक तथा पर्यटकांना स्वगृही पाठविण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

परराज्यातील ५४६ जणांना स्वगृही पाठविण्याच्या हालचाली
बुलडाणा: जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील जवळपास ५४६ मजुर, नागरिक तथा पर्यटकांना स्वगृही पाठविण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या आहेत. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात अडकलेल्या नऊ राज्यातील व्यक्तींकडे जवळपास दहा वाहने उपलब्ध असल्याचीही माहिती असून आंतरराज्य प्रवासासाठी जिल्हाधिकारी किंवा राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालकांची परवानगी मिळणे ही अनिवार्य आहे.
त्यानुषंगाने केंद्र सरकारने मजूर, पर्यटकांना त्यांच्या स्वगृही जाण्यास मान्यता दिली असली तरी जोपर्यंत तांत्रिक बाबींची पुर्तता होत नाही, तो पर्यंत प्रत्यक्ष या नागरिकांचे प्रस्थान होणे काहीसे कठीण आहे.
बुलडाणा जिल्ह्यात उत्तर प्रदेशातील १६२, मध्यप्रदेशताील ३३, झारखंडमदील ६९, महाराष्ट्रातील उर्वरित भागातील १४०, तेलंगणातील पाच, बिहारमधील ३२, आंध्रप्रदेशमधील आठ, गुजरातमधील एक, उत्तराखंडमधील चार जणांचा समावेश आहे. या सर्व व्यक्ती आपल्या स्वगृही जाण्यास इच्छूक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली असून त्याचा मास्टर पॅलनही प्रशासनाने बनविला आहे.