आईवर अत्याचार करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST2021-06-09T04:43:07+5:302021-06-09T04:43:07+5:30
पिंपळगाव सराई : स्वत:च्या आईवरच अत्याचार केल्याची घटना रायपूर पाेलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या एका गावात घडली हाेती. या प्रकरणी ...

आईवर अत्याचार करणाऱ्यास अटक
पिंपळगाव सराई : स्वत:च्या आईवरच अत्याचार केल्याची घटना रायपूर पाेलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या एका गावात घडली हाेती. या प्रकरणी रायपूर पाेलिसांनी आराेपी मुलास अटक करून न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने त्याला दाेन दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली.
रायपूर पाेलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या एका गावात ४५ वर्षीय मुलाने ६५ वर्षीय आईवर अत्याचार केल्याची घटना ६ जून राेजी घडली हाेती. या प्रकरणी पाेलिसांनी नराधम मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आराेपी मुलगा पसार झाला हाेता. साेमवारी सकाळी ८ वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत तायडे, शेख कयूम यांनी आराेपी मुलास अटक केली. रायपूरचे ठाणेदार सुभाष दुधाळ यांनी आराेपीला चिखली न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दाेन दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली.