मोताळय़ाच्या युवकाचा एदलाबादजवळ अपघातात मृत्यू

By Admin | Updated: September 28, 2016 01:12 IST2016-09-28T01:12:08+5:302016-09-28T01:12:08+5:30

राष्ट्रीय महामार्गावर अपघात; तरूणाचा घटनास्थळीच मृत्यू.

Motalay's youth dies in an accident near Adalabad | मोताळय़ाच्या युवकाचा एदलाबादजवळ अपघातात मृत्यू

मोताळय़ाच्या युवकाचा एदलाबादजवळ अपघातात मृत्यू

मोताळा(जि. बुलडाणा), दि. २८- एदलाबादवरून दुचाकीने घराकडे परत येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोताळा येथील तरूणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना २६ सप्टेंबरच्या रात्री ११:३0 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर एदलाबाद नजीकच्या ङ्म्री साई ढाब्याजवळ घडली. अज्ञात वाहनाची धडक एवढी जोरदार होती की, दुचाकीवरील राहुल पाटील या युवकाला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यासाठीही संधी मिळाली नाही. मोताळा येथील शिवाजी कॉलेज परिसरातील राहुल सुभाष पाटील (प्रभाग क्रमांक १३) हा युवक कामानिमित्त एदलाबादला गेला होता. घराकडे परतताना त्याचा अपघात झाला होता.

Web Title: Motalay's youth dies in an accident near Adalabad