शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

बुलडाणा जिल्ह्यात कोविड हॉस्पिटलमधील ९५ टक्क्यांपेक्षा जास्त बेड रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 12:29 PM

Corona Cases in Buldhana : नवीन कोविडबाधित आढळण्याची संख्या रोडावल्याने या कोविड रुग्णालयांमधील ९५ टक्क्यांपेक्षा जास्त बेड रिक्त आहेत

- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये कोविड बाधितांवर उपचार करण्यात येत असले तरी सध्या नवीन कोविडबाधित आढळण्याची संख्या रोडावल्याने या कोविड रुग्णालयांमधील ९५ टक्क्यांपेक्षा जास्त बेड रिक्त आहेत. कोविड संकटाच्या काळात ही बाब आरोग्य यंत्रणेसह नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे. जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात सर्वसाधारण, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर, आयसीयू अशा एकूण २,६२७ रुग्ण खाटांची व्यवस्था आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात ८०५ ऑक्सिजन बेडची व्यवस्था आहे तर  १०३ रुग्ण उपचार घेत असून, ७०२ बेड रिक्त आहेत. तसेच आयसीयू बेड ४८७ असून २५ रुग्ण उपचार घेत आहे तर ४६२ बेड रिक्त आहेत. १०५ व्हेंटीलेटर बेड असून, एक रुग्ण उपचार घेत आहे, उर्वरित बेड रिक्त आहेत. जिल्ह्यात एकूण १,२३० सर्वसाधारण बेड असून ५४ रुग्ण उपचार घेत आहेत तर १,१७६ बेड रिक्त आहेत. सध्या नवीन कोविडबाधित सापडण्याची गती मंदावल्याने या कोविड केअर सेंटरमध्ये बेड रिक्त आहेत. जिल्ह्यात एक महिन्याआधी दुसऱ्या लाटेत १ हजारापेक्षा जास्त रुग्ण दररोज आढळत होते. यामध्ये घट होऊन आता दररोज ४० ते ५० रुग्ण आढळत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ५,४२,५७५ आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८६,१६८ कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी ८५,४१९ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ९६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत. 

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या