शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

खामगाव शहरातील ४० पेक्षा अधिक इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 12:20 PM

बुलडाणा जिल्ह्यात अनेक शिकस्त आणि धोकादायक इमारती उभ्या असतानाही काही पालिका प्रशासनाकडून सर्व्हेच झाला नसल्याचे वास्तव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/खामगाव: जिल्ह्यात अनेक शिकस्त आणि धोकादायक इमारती उभ्या असतानाही काही पालिका प्रशासनाकडून सर्व्हेच झाला नसल्याचे वास्तव आहे, तर खामगाव शहरातील विविध भागात ४० पेक्षा अधिक इमारती धोकादायक आहेत. राज्यात धोकादायक इमारतींमुळे वाढणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धोकादायक इमारतींचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.गत काही वर्षांमध्ये खामगाव शहराचा विस्तार वाढला आहे. दरम्यान, शहरातील १६ प्रभागांच्या तुलनेत बाजारपेठ आणि पुरातन वस्ती असलेल्या प्रभाग क्रमांक ६ मध्ये शिकस्त आणि धोकादायक इमारतींची संख्या अधिक आहे. त्याचप्रमाणे शिवाजी वेस, सनी पॅलेस, नटराज गार्डन, गांधी चौक, फरशी, सुटाळपुरा टिळक पुतळा या भागातही शिकस्त इमारती आहेत. यापैकी बहुतांश शिकस्त इमारती या निर्जन आहेत; मात्र बाजारपेठेतील काही इमारतीत अद्यापही रहिवासी आहेत. काही दिवसांपूर्वीच महावीर चौकातील एका इमारतीचा काही भाग कोसळून अपघात घडला होता. या पार्श्वभूमीवर नगर पालिका प्रशासनाने शहराच्या विविध भागातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण सुरू केले; मात्र गत काही दिवसांपासून सुरू करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात खोडा पडला आहे. त्यामुळे शिकस्त इमारतींचे सर्वेक्षण रखडल्याची माहिती समोर येत आहे.

स्ट्रक्चरल आॅडिटच नाही!बुलडाणा जिल्ह्याच्या ठिकाणच्या अनेक महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांचा कारभार शिकस्त इमारतींमध्ये चालतो. शहरातील मुख्य बाजारपेठेतही अनेक इमारती धोकादायक आहेत; पण बुलडाणा पालिकेकडून स्ट्रक्चरल आॅडिटच होत नसल्याचा मुद्दा समोर आला आहे.

ब्रिटिशकालीन इमारतींमध्ये कारभारजिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयांचा कारभार आजही ब्रिटिशकालीन इमारतींमध्ये सुरू आहे. बुलडाणा येथील पाटबंधारे विभागाचे कार्यालयही अत्यंत जुनाट इमारतीमध्ये थाटलेले आहे.

बुलडाणा शहरातील शिकस्त इमारती, विना परवाना बांधकाम स्ट्रक्चरल आॅडिट झालेले नाही. या वर्षभरात ९७ बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे.- वाय. जी. देशमुख,कनिष्ठ अभियंता नगरपालिका, बुलडाणा.

खामगावातील शिकस्त आणि धोकादायक इमारतींची माहिती संकलीत करण्यात येत आहे. या इमारतीचे सर्वेक्षण पूर्ण होताच पुढील कारवाई केली जाईल.- पंकज काकडनगर रचना सहायकनगर परिषद, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा