अज्ञात इसमाकडून माकडाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2017 00:10 IST2017-07-01T00:10:27+5:302017-07-01T00:10:27+5:30
जामोद : अज्ञात इसमाने बंदुकीने छर्रे मारुन माकडाची हत्या केल्याची घटना जामोद येथे शुक्रवारी घडली.

अज्ञात इसमाकडून माकडाची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
जामोद : अज्ञात इसमाने बंदुकीने छर्रे मारुन माकडाची हत्या केल्याची घटना जामोद येथे शुक्रवारी घडली.
येथील प्रदीप मोतीराम घुर्डे यांच्या गावालगत असलेल्या शेतात माकड जखमी अवस्थेत आढळून आले. त्याच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना बोलावले असता, त्यांनी माकडास मृत घोषित केले. या माकडाच्या अंगावर बंदुकीने छर्रे मारल्याच्या खुणा दिसून आल्या. त्यामुळे अज्ञात इसमाने त्याची हत्या केली असल्याचे नागरिक बोलत आहेत.