पैशाची बॅग लंपास; दोन महिलांना पकडले!

By Admin | Updated: May 1, 2017 23:51 IST2017-05-01T23:51:02+5:302017-05-01T23:51:02+5:30

खामगाव : दागिने खरेदीसाठी आलेल्या एका इसमाची पैशाची बॅग लंपास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना मेनरोडवरील कस्तुरचंद ज्वेलर्सजवळ घडली.

Money bag lump; Two women caught! | पैशाची बॅग लंपास; दोन महिलांना पकडले!

पैशाची बॅग लंपास; दोन महिलांना पकडले!

खामगाव : दागिने खरेदीसाठी आलेल्या एका इसमाची पैशाची बॅग लंपास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना मेनरोडवरील कस्तुरचंद ज्वेलर्सजवळ घडली.
सुटाळा बु. येथील रहिवासी जयंत हरिभाऊ होनाळे (वय ३०) हे रविवारी दुपारी नातेवाईकांसह लग्नासाठी दागिने खरेदी करण्याकरिता येथील कस्तुरचंद ज्वेलर्समध्ये आले होते. त्याचवेळी दुकानामध्ये मीरा विठ्ठल शिंदे (वय २५) व रंजना राजेश शिंदे (वय २२) दोघी रा. चिखली या बनावट ग्राहक बनून आल्या. यावेळी त्यांनी गर्दीचा फायदा घेत होनाळे यांची १ लाख ३० हजार रुपये नगद असलेली बॅग लंपास करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॅग लंपास झाल्याची बाब होनाळे यांच्या लक्षात येताच त्यांनी सदर महिलांचा पाठलाग करून त्यांना गांधी चौक परिसरात पकडले व त्यांची विचारपूस करून त्यांच्या ताब्यातून आपली पैशाची बॅग जप्त करून त्यांना शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी होनाळे यांच्या तक्रारीवरून उपरोक्त दोघींविरुद्ध कलम ३७९, ५११ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Money bag lump; Two women caught!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.