महिलेचा विनयभंग
By Admin | Updated: May 26, 2015 02:24 IST2015-05-26T02:24:35+5:302015-05-26T02:24:35+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील डोंगरशेवली येथील घटना; गुन्हा दाखल.

महिलेचा विनयभंग
अमडापूर (जि. बुलडाणा) : अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या डोंगरशेवली येथील एका ४२ वर्षीय महिलेचा रात्री विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकरणी २५ मे रोजी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी डोंगरशेवली येथील एका महिलेने तक्रार दिली की, २ मे रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास मुलासह घरात झोपलेली असताना आरोपी संजय वसंता सोनुने रा. डोंगरशेवली याने घराच्या मागील दारा तून घरात प्रवेश करून माझा विनयभंग केला, अशी तक्रार ४२ वर्षीय महिलेने अमडापूर पो.स्टे.ला २५ मे रोजी दिल्यावरून आरोपी संजय वसंता सोनुने रा. डोंगरशेवली याच्याविरुद्ध अप.नं. ४६/0१५ कलम ३५४(अ) ४५२, ५0६ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ अलका वाघमारे हे करीत आहे.