अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:31 IST2021-07-26T04:31:10+5:302021-07-26T04:31:10+5:30
या प्रकरणी २४ जुलै रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेंबा येथील अल्पवयीन मुलगी ही ॲटोद्वारे मोताळा ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग
या प्रकरणी २४ जुलै रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेंबा येथील अल्पवयीन मुलगी ही ॲटोद्वारे मोताळा येथे येत होती. याच ॲटोमध्ये नांदुरा तालुक्यातील खैरा येथील प्रशांत बाबुराव मापारी हा युवकही मोताळ्याकडे जात होता. दरम्यान, शेंबा येथील नदीच्या पुलाजवळ प्रशांत मापारी याने अल्पवयीन मुलीस तू मला आवडतेस, तुझा मोबाईल क्रमांक दे असे म्हणून मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडित मुलीने बोराखेडी पोलीस ठाण्यात प्रशांत मापारी विरोधात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी प्रशांत विरोधात अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक रोकडे हे करीत आहेत.